पंजाबमध्ये विषारी दारूमुळे २१ जणांचा मृत्यू, तपासासाठी एसआयटीची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 04:10 PM2020-07-31T16:10:08+5:302020-07-31T16:16:07+5:30

या प्रकरणी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत. याचा तपास जालंधरच्या विभागीय आयुक्तांकडे सोपविण्यात आला आहे.

amritsar and taran taran 21 people died due to drinking spurious liquor | पंजाबमध्ये विषारी दारूमुळे २१ जणांचा मृत्यू, तपासासाठी एसआयटीची स्थापना

पंजाबमध्ये विषारी दारूमुळे २१ जणांचा मृत्यू, तपासासाठी एसआयटीची स्थापना

Next
ठळक मुद्देया प्रकरणी तरसिक्क पोलीस ठाण्याच्या एसएचओला (स्टेशन हेड ऑफिसर) निलंबित केले आहे. याशिवाय, याप्रकरणी तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.

चंदीगड : पंजाबमधील अमृतसर, बटाला आणि तरनतारन याठिकाणी विषारी दारू पिल्याने आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी विषारी दारू तयार करणार्‍या काही लोकांना अटक केली आहे. तसेच, तरसिक्क पोलीस ठाण्याच्या एसएचओला (स्टेशन हेड ऑफिसर) निलंबित केले आहे. याशिवाय, याप्रकरणी तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.

यासंदर्भातील माहिती डीजीपी दिनकर गुप्ता यांनी दिली. यावेळी विषारी दारूमुळे २९ जून रोजी अमृतसर ग्रामीणचे पोलीस ठाणे तरसिक्कच्या अंतर्गत येणाऱ्या मुच्छल व तंग्रा या ठिकाणी पहिल्यांदा पाच जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर ३० जुलै रोजी संध्याकाळी मुच्छलमध्ये आणखी दोन जणांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला, तर एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतर मुच्छल गावात आणखी दोन मृत्यू तर बटाला शहरात दोन लोकांचा मृत्यू झाला. आज पुन्हा बटाला येथे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच बटालामध्ये विषारी दारू पिल्याने सात लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, तरणतारणमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे, असे दिनकर गुप्ता यांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत. याचा तपास जालंधरच्या विभागीय आयुक्तांकडे सोपविण्यात आला आहे. तसेच, याप्रकरणी तपास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांना कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याची किंवा तज्ज्ञांची मदत घेण्याची मुभा दिली आहे. तपासात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे.

विषारी दारूच्या प्रकरणात पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. तसेच, या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी राज्यात कार्यरत असलेल्या कोणत्याही मद्यनिर्मिती यंत्रणेवर कारवाई करण्यासाठी पोलिसांना शोध मोहीम सुरू करण्याचे निर्देश दिले. पोलिसांनी बलविंदर कौरला अटक केली आहे. एसएसपी अमृतसर-ग्रामीणद्वारे स्थापन केलेल्या एसआयटीमार्फत तपास सुरू आहे. चार जणांचे (जसविंदरसिंग, काश्मीर सिंग, कृपाल सिंग आणि जसवंत सिंग) आज शवविच्छेदन केले जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

आणखी बातम्या...

सीमेवर चीनच्या हालचाली पुन्हा वाढल्या; पँगोंगमध्ये अतिरिक्त सैन्य, बोटी तैनात    

CoronaVirus News : कोरोना व्हायरस पाण्यामुळे मरतो, रशियन शास्त्रज्ञांचा दावा    

गाडी चालवताना मोबाईलवर बोलल्यास दहा हजारांचा दंड, युपी सरकारकडून आदेश जारी    

मंत्र्यांची कोरोनावर मात, पण स्वागतावेळी कार्यकर्त्यांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा    

कोरोनामुक्त झालात, मग प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घ्या; डोनाल्ड ट्रम्प यांचे आवाहन    

Web Title: amritsar and taran taran 21 people died due to drinking spurious liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.