पुष्पक एक्सप्रेस दरोडा प्रकरणातील सर्व आरोपी गजाआड; दोघांनी केलेला महिलेवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 08:52 PM2021-10-10T20:52:45+5:302021-10-10T20:53:19+5:30

८ ऑक्टोबर रोजी रात्री साडे सात वाजता लखनऊ सीएसटी पुष्पक एक्सप्रेसमध्ये डी टू या बोगीत दरोडा टाकण्यात आला.

All the accused in the Pushpak Express robbery case have been acquitted; Rape of a woman by both of them | पुष्पक एक्सप्रेस दरोडा प्रकरणातील सर्व आरोपी गजाआड; दोघांनी केलेला महिलेवर बलात्कार

पुष्पक एक्सप्रेस दरोडा प्रकरणातील सर्व आरोपी गजाआड; दोघांनी केलेला महिलेवर बलात्कार

googlenewsNext

कल्याण- पुष्पक एक्सप्रेसमध्ये दरोडा टाकून महिलेवर बलात्कार प्रकरणी कल्याण जीआरपी पोलिसांनी आठ आरोपींना बेडय़ा ठोकल्या आहेत. आठ पैकी दोन दरोडेखोरांनी महिलेवर बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. हा दरोडा सुनियोजित नसला तरी आरोपी हे सराईत आणि गुन्हेगार मानसिकतेचे असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

८ ऑक्टोबर रोजी रात्री साडे सात वाजता लखनऊ सीएसटी पुष्पक एक्सप्रेसमध्ये डी टू या बोगीत दरोडा टाकण्यात आला. आठ दरोडेखोरांनी 16 प्रवाशांना मारहाण करुन त्यांच्याकडील मोबाईल रोकड लूटली होती. मारहाणीत सहा प्रवासी जखमी झाले. नऊ प्रवाशांचे मोबाईल आणि सहा प्रवाशांची रोकड आणि एका महिलेवर दोन आरोपींनी बलात्कार केला. कसारा स्टेशनच्या आधी आरोपीपैकी एकाने गाडीची साखळी खेचली. तीन आरोपी पळून गेले. उर्वरीत पाच पैकी तीन कसारा स्टेशन आल्यावर उतरले. 
उर्वरीत दोन आरोपींना प्रवाशांनी पकडून ठेवले. या दोन आारेपींकडून पोलिसांनी माहिती घेतली आणि तपास सुरु केला.

मध्य रेल्वेचे पोलिस आयुक्त कैसर खालीद, उपायुक्त मनोज पाटील, वरिष्ठ पोलिस निरिक्षक वाल्मीक शादरूल रेल्वे पोलिसांचे तीन पथके आणि कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी तपास सुरु केला. या गुन्हयातील सर्व आरोपी अशरद शेख, प्रकाश पारधी, अजरून परदेशी, किशोर सोनवणो, काशीनाथ तेलंग, आकाश शेनोरे, धनंजय भगत आणि राहूल आडोळे या आठही जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

आठ पैकी सात आरोपी हे नाशीक येथील घोटी टाके येथील आहेत एक आरोपी मुंबईचा आहे. आकाश शेनोरे या सर्वाचा म्होरक्या आहे. सर्व आरोपींनी घोटी येथे मद्यपान केले. नंतर इगतपूरी स्टेशन येथे मद्यपान केले. तसेच गांजा ओढला होता. नशापान करुन ते इगतपूरी येथे लखनऊ एक्सप्रेसमध्ये चढले. दरोडय़ाचे काही प्लॅनिंग केले नव्हते. सर्व आरेोपी हे गुन्हेगारी मानसिकतेचे आणि सराईत असल्याची माहिती समोर आली आहे.

यापैकी चार आरोपींना काल अटक केली होती. त्याना रेल्वे न्यायालयात हजर केले असता १६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी दिली गेली होती. त्यानंतर आज चार आरोपींना अटक केली गेली. त्यपैकी एकाला आज न्यायालयात हजर केले असता त्याला ही १६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. उर्वरीत तीन आरोपींना उद्या न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पिडीत महिलेची वैद्यकीय तपासणी केल्यावर तिच्या पतीसह तिच्या नातेवाईकाच्या घरी साेडण्यात आले आहे. तसेच केंद्र सरकारच्या मनोधैर्य योजने अंतर्गत पिडीत महिलेला आर्थिक मदत देण्याचा माहिती पोलिसांमार्फत सरकारला कळविण्यात आली आहे.
 

 

Web Title: All the accused in the Pushpak Express robbery case have been acquitted; Rape of a woman by both of them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.