TikTok प्रकरणी अभिनेता एजाज खानला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 05:40 PM2019-07-18T17:40:44+5:302019-07-18T17:57:30+5:30

TikTok प्रकरणी अभिनेता एजाज खानला गुरुवारी अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावर हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे वादग्रस्त व्हिडीओ पोस्ट केल्याने एजाज खानला अटक करण्यात आली.

Ajaz Khan arrested for sharing controversial Tik Tok video | TikTok प्रकरणी अभिनेता एजाज खानला अटक

TikTok प्रकरणी अभिनेता एजाज खानला अटक

Next
ठळक मुद्देTikTok प्रकरणी अभिनेता एजाज खानला गुरुवारी अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून ही कारवाई करण्यात आली.हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे वादग्रस्त व्हिडीओ पोस्ट केल्याने एजाज खानला अटक करण्यात आली.

मुंबई - TikTok प्रकरणी अभिनेता एजाज खानला गुरुवारी (18 जुलै) अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावर हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे वादग्रस्त व्हिडीओ पोस्ट केल्याने एजाज खानला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून ही कारवाई करण्यात आली. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

मुंबईतील पाच तरुणांनी टिक टॉकवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. वादग्रस्त व्हिडीओ अपलोड केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. झारखंडमधील तबरेज अन्सारीच्या हत्येचा या व्हिडीओमध्ये उल्लेख करण्यात आला होता. याप्रकरणाची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली होती. एजाजने यापैकी एका व्यक्तीचं समर्थन करत टिकटॉकवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओत त्याने मुंबई पोलिसांची खिल्ली उडवली होती. त्यानंतर आता एजाज खानला अटक करण्यात आली आहे. 


एजाज खान याने अनेक टीव्ही मालिका व बिग बॉसमध्ये काम केलेलं आहे.  अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी एजाज खानला याआधी नवी मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली होती. टिक टॉक या अ‍ॅपची सध्या तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. प्रसिद्धीसाठी अनेक जण विविध विषयांवरील आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट करत असतात. प्रसिद्धीसाठी अनेक जण विविध विषयांवरील आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट करत असतात. असाच एक आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करणं काही दिवसांपूर्वी पाच तरुणांच्या अंगलट आलं होतं.  

tik tok user made hatred video on tabrej ansari mumbai cyder cell filed case | TikTok वर तबरेजच्या हत्येबाबत वादग्रस्त व्हिडीओ, 5 जणांवर गुन्हा दाखल

मुंबईतील पाच तरुणांनी टिक टॉकवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. वादग्रस्त व्हिडीओ अपलोड केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. झारखंडमधील तबरेज अन्सारीच्या हत्येचा या व्हिडीओमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. टीम 07 या नावाने त्यांनी व्हिडीओ अपलोड केला होता. कमी वेळात हा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला. या तरुणांच्या फॉलोअर्सची संख्याही खूप जास्त आहे. 'तबरेजला तर तुम्ही मारुन टाकलं मात्र भविष्यात त्याच्या मुलाने याचा बदला घेतल्यास मुसलमान दहशतवादी असतो असं म्हणू नका' असा वादग्रस्त मजकूर या टिक टॉकच्या या व्हिडिओत आहे. याप्रकरणाची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली होती. 


टिकटॉक आणि हॅलो अ‍ॅपवर बंदी येण्याची शक्यता आहे. सरकारने या दोन्ही अ‍ॅप्सना नोटीस पाठवली आहे. यामध्ये त्यांना 21 प्रश्न विचारण्यात आले आहेत. जर या प्रश्नांना योग्य उत्तरं मिळाली नाहीत तर टिकटॉक आणि हॅलो अ‍ॅपवर बंदी येऊ शकते. स्वदेशी जागरण मंचाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना टिकटॉक आणि हॅलोसारख्या सोशल मीडिया अ‍ॅपवर बंदी घालण्यात यावी यासाठी एक पत्र लिहिलं आहे. हे दोन्ही अ‍ॅप राष्ट्राच्या विरोधात असल्याचं म्हटलं आहे. समाजाला यापासून धोका असल्याने या अ‍ॅपवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. याआधी टिकटॉकच्या माध्यमातून आत्महत्या आणि गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप करत टिकटॉकवर बंदी आणावी अशी मागणी करण्यात आली होती.  तसेच काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने गुगल आणि अ‍ॅपला प्ले स्टोअरमधून टिकटॉक अ‍ॅप हटविण्यास सांगितले होते. 

 

Web Title: Ajaz Khan arrested for sharing controversial Tik Tok video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.