Video : लोकलमध्ये पुन्हा स्टंटबाजी; तरुणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 04:03 PM2019-08-01T16:03:30+5:302019-08-01T16:12:27+5:30

या तरुणाला रोखून त्याला वडाळा स्थानकात त्यांना उतरवले.

Again stunt in local train; Police arrested the young boys | Video : लोकलमध्ये पुन्हा स्टंटबाजी; तरुणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

Video : लोकलमध्ये पुन्हा स्टंटबाजी; तरुणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

Next
ठळक मुद्दे हे स्टंट करत असताना वडाळा लोहमार्ग पोलिसांचा एक हवालदार या डब्ब्यात होता. मोसीनला वडाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

मुंबई - हार्बर मार्गावरील रेल्वेच्या लोकलमध्ये चेंबूर आणि वडाळा रेल्वेस्थानकादरम्यान लोकलमध्ये स्टंट करणाऱ्या दोघांना लोहमार्ग पोलिसांनीअटक केली आहे. मोहम्मद मोसीन असे यातील स्टंट करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यासोबत त्याचा एक अल्पवयीन मित्र देखील होता. हे स्टंट करत असताना वडाळा लोहमार्ग पोलिसांचा एक हवालदार या डब्ब्यात होता. त्याने हा स्टंट मोबाईलमध्ये कैद केला आणि या तरुणाला रोखून त्याला वडाळा स्थानकात त्यांना उतरवले. मोसीनला वडाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दल वारंवार जनजागृती करून देखील अशा स्टंटबाजांवर कोणताही परिणाम होत नसल्याचं दिसून येत आहे. 

 

Web Title: Again stunt in local train; Police arrested the young boys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.