Again, dacoity in the temple in bhiwandi | भिवंडीत पुन्हा मंदिरातील दानपेटी फोडून रक्कम लांबवली  
भिवंडीत पुन्हा मंदिरातील दानपेटी फोडून रक्कम लांबवली  

ठळक मुद्देया मंदिरात रात्री चोरट्यांनी देवीची दानपेटी फोडून त्यामधील पाच ते सहा हजाराची रक्कम लांबविल्याबाबत तक्रार  तक्रार मंदिराचे पुजारी प्रशांत पूजारी यांनी भिंवडी शहर पोलिसात दिली आहे. 

अनगांव - भिवंडी शहरात चोरीच्या घटनात वाढ झाली आसतानाच पद्मानगर येथील दूर्गादेवी मंदिराच्या धरवाजाचे कुलूप तोडून मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी सहा हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना घडल्याने भक्तांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे 
शहरातील पद्मानगर येथील मौनीका परमिटरूमच्या बाजूला दूर्गामातेचे मंदिर आहे. या मंदिरात रात्री चोरट्यांनी देवीची दानपेटी फोडून त्यामधील पाच ते सहा हजाराची रक्कम लांबविल्याबाबत तक्रार मंदिराचे पुजारी प्रशांत पूजारी यांनी भिंवडी शहर पोलिसात दिली आहे. 


Web Title: Again, dacoity in the temple in bhiwandi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.