‘पुष्पा’ आणि ‘भौकाल’ पाहून अल्पवयीन मुलांनी बनवली ‘बदनाम गँग’, प्रसिद्धीसाठी केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 07:14 PM2022-01-21T19:14:20+5:302022-01-21T19:23:47+5:30

Crime News : आरोपींनी खुनाची घटना स्वतःच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याचा आरोपींचा कट होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

After watching 'Pushpa' and 'Bhaukal', minors made 'Badnam Gang', killed for publicity | ‘पुष्पा’ आणि ‘भौकाल’ पाहून अल्पवयीन मुलांनी बनवली ‘बदनाम गँग’, प्रसिद्धीसाठी केली हत्या

‘पुष्पा’ आणि ‘भौकाल’ पाहून अल्पवयीन मुलांनी बनवली ‘बदनाम गँग’, प्रसिद्धीसाठी केली हत्या

googlenewsNext

बदनाम गँगच्या नावाने आपली टोळी तयार करून प्रसिद्ध होण्यासाठी एका व्यक्तीची हत्या करणाऱ्या अशा तीन अल्पवयीन मुलांना दिल्लीपोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी खुनाची घटना स्वतःच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याचा आरोपींचा कट होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ अपलोड करण्यामागे परिसरात त्याच्या नावाचा दरारा निर्माण करणं एवढाच नव्हता तर त्यांच्या टोळीची 'बदनाम गँग' ओळखून भीती निर्माण करणे हा असेल. चौकशीदरम्यान असे समजले आहे की, पुष्पा चित्रपट आणि भौकाल ही वेब सिरीज पाहून अल्पवयीन मुलांना ही कल्पना सुचली होती.

काय आहे संपूर्ण प्रकरण ?  

१९ जानेवारी रोजी जहांगीर पुरी पोलिस स्टेशनला फोन आला की, एका व्यक्तीला अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले आहे. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असता उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. शिबू असे मृताचे नाव आहे.

तपासादरम्यान शिबूचे कोणाशीही शत्रुत्व नसून ही हत्या लुटण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचे पोलिसांना समोर आले. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूचे सर्व सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये, दिल्ली पोलिसांना शिबूसोबत तीन मुले भांडण करताना आणि मारहाण करताना दिसत होते.

यानंतर पोलिसांनी तिघांचीही ओळख पटवली आणि नंतर त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत पोलिसांना समजले की, तिन्ही आरोपी अल्पवयीन आहेत, त्यामुळे पोलीस याप्रकरणी बाल न्याय मंडळाच्या नियमानुसार कारवाई करत आहेत, पोलिसांनी तिन्ही आरोपींची चौकशी केली असता त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे समोर केले.

पुष्पा चित्रपट पाहिल्यानंतर गँग तयार झाली

प्रथमत: तिघांचे पीडितेसोबत कोणतेही वैर नसल्याचे पोलिसांना समजले. आरोपीने गेल्या काही दिवसांपूर्वी पुष्पा हा चित्रपट तसेच भौकाल ही वेबसिरीज पाहिली होती. यानंतर स्वत:ची टोळी तयार करून परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात होते.

यानंतर तिघांनीही आपापली टोळी तयार केली, ज्याला त्यांनी 'बदनाम गँग' असे नाव दिले. १९ तारखेला त्याने शिबूची चाकूने हत्या केली आणि त्याच्या एका साथीदाराने ही संपूर्ण घटना आपल्या मोबाईलमध्ये कैद केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला जाईल, जेणेकरून लोक त्यांना आणि त्यांच्या टोळीबाबत दरारा निर्माण होऊन घाबरतील, असा त्यांचा कट होता, असे पोलिसांनी सांगितले. मात्र, त्यांचा डाव यशस्वी होण्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी त्यांना पकडले. या संपूर्ण घटनेची नोंद असलेला मोबाईल फोनही पोलिसांनी जप्त केला असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला चाकूही जप्त करण्यात आला आहे.

Web Title: After watching 'Pushpa' and 'Bhaukal', minors made 'Badnam Gang', killed for publicity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.