Actor Jitendra Joshi tweeted a video of mannerless driver who are breaking traffic rules | अभिनेता जितेंद्र जोशीने बेशिस्त वाहनचालकांचा व्हिडीओ केला ट्विट 
अभिनेता जितेंद्र जोशीने बेशिस्त वाहनचालकांचा व्हिडीओ केला ट्विट 

ठळक मुद्देहा व्हिडीओ त्याने मुंबई वाहतूक पोलीस आणि मुंबई पोलिसांना टॅग केला आहे. मुंबई पोलिसांनी अभिनेता जितेंद्र जोशी यांच्या ट्विटला प्रतिसाद देत नेमक्या ठिकाणाची माहिती देखील ट्विटरद्वारे मागितली आहे.   

मुंबई - मुंबईतच काय तर राज्यात वाहतुकीचे नियमांची पायमल्ली करणारे आपल्याला आढळून येतात. अभिनेता जितेंद्र जोशीने वाहतुकीचे नियम पायदळी तुटवणाऱ्यांचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. तसंच हा व्हिडीओ त्याने मुंबई वाहतूक पोलीस आणि मुंबई पोलिसांना टॅग केला आहे. त्यावर तात्काळ मुंबई पोलिसांनी अभिनेता जितेंद्र जोशी यांना तात्काळ प्रतिसाद दिला आहे. हा व्हिडीओ पवई परिसरातला असून अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनचालक विरुद्ध दिशेने गाड्या चालवताना व्हिडिओत दिसत आहे. त्यामुळे अपघात होऊ शकतो. अशा बेशिस्त आणि वाहतुकीचे नियम पायदळी तुडविणाऱ्या वाहनचालकांना कायद्याचा धाक दाखविणे गरजेचं आहे. मुंबई पोलिसांनी अभिनेता जितेंद्र जोशी यांच्या ट्विटला प्रतिसाद देत नेमक्या ठिकाणाची माहिती देखील ट्विटरद्वारे मागितली आहे.   

Web Title: Actor Jitendra Joshi tweeted a video of mannerless driver who are breaking traffic rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.