बोगस मतदार नोंदणी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल; भिवंडी प्रांताधिकाऱ्यांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 06:43 PM2021-12-04T18:43:27+5:302021-12-04T18:48:18+5:30

Bogus voter Registrants : ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रांताधिकाऱ्यांनी बोगस मतदारांवर केलेल्या या कारवाईमुळे बोगस मतदार नोंदणी करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे . 

Action in Bhiwandi; Crime cases filed against bogus voter registrants | बोगस मतदार नोंदणी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल; भिवंडी प्रांताधिकाऱ्यांची कारवाई

बोगस मतदार नोंदणी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल; भिवंडी प्रांताधिकाऱ्यांची कारवाई

googlenewsNext

नितिन पंडीत 

भिवंडी - बनावट कागदपत्राचे आधारे नवीन मतदार नोंदणी करताना बोगस मतदार नोंदणी प्रकरणे भिवंडीचे उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी उघडकीस आणली असून या प्रकरणी बोगस नोंदणी करणाऱ्यांवर गुरुवारी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रांताधिकाऱ्यांनी बोगस मतदारांवर केलेल्या या कारवाईमुळे बोगस मतदार नोंदणी करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे . 

 महाराष्ट्र निवडणूक आयोग यांचे निर्देशानुसार भिवंडी उपविभागीय महसूल कार्यक्षेत्रात नवीन मतदार नोंदणीचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. १३७ भिवंडी पूर्व विधानसभा मतदार संघातील नवीन मतदारांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करताना अबूबकर अब्दुल गफार चौधरी, ज्योत्स्ना जगदीश बेरदिया, मनिष लालमन केसरी, राधा बोगा, गणेश नागेश नक्का व श्रीनिवास रामस्वामी बोगा यांनी बोगस कागदपत्रे व निवासी पत्त्यासाठी टोरेंट पावर कंपनी यांची बोगस वीजबिले अपलोड केली होती. सदर कागदपत्रांच्या छाननी केली असता सदर व्यक्तींनी दाखल केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे प्रांत कार्यालयाचे नायब तहसीलदार विठ्ठल गोसावी यांचे लक्षात आले असता सदर बाब गोसावी यांनी प्रांताधिकारी वाकचौरे यांच्या निदर्शनास आणून दिली असता, वाकचौरे यांनी बनावट कागदपत्रां आधारे मतदार नोंदणीसाठी अर्ज सादर करणाऱ्या वर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले होते . त्यानुसार शांतीनगर पोलिस ठाण्यात बोगस मतदार नोंदणी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलिस निरीक्षक शैलेंद्र म्हात्रे करीत आहेत.

भिवंडीत बोगस मतदारांची नोंदणी होत असल्याची माहिती समोर अली असता याबाबत सक्त धोरण अवलंबविण्याच्या सूचना आपण प्रशासनास दिल्या असून यानंतर बोगस मतदार नोंदणी प्रकरणांची आणखी खोल तपासणी करण्यात येणार असून बोगस नवे आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया भिवंडी प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी दिली आहे. 

Web Title: Action in Bhiwandi; Crime cases filed against bogus voter registrants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.