बेकायदा वास्तव्य करणाऱ्यांवर कारवाई, सहा नायझेरियन ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2020 01:36 AM2020-12-06T01:36:19+5:302020-12-06T01:36:32+5:30

Crime News : नवी मुंबई लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा नायझेरियन व्यक्तींचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यात अनेक जण व्हिसा संपलेला असताना बेकायदा वास्तव्य करत आहेत.

Action against illegal occupants, six Nigerians detained | बेकायदा वास्तव्य करणाऱ्यांवर कारवाई, सहा नायझेरियन ताब्यात

बेकायदा वास्तव्य करणाऱ्यांवर कारवाई, सहा नायझेरियन ताब्यात

googlenewsNext

नवी मुंबई : भारतात विनापरवाना बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी सहा नायझेरियन व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. जुहूगाव येथे भाड्याने जागा घेऊन त्यांच्याकडून हॉटेल चालविले जात होते. त्या ठिकाणावरून दारूसाठाही जप्त करण्यात आला आहे.

नवी मुंबई लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा नायझेरियन व्यक्तींचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यात अनेक जण व्हिसा संपलेला असताना बेकायदा वास्तव्य करत आहेत. अशा व्यक्तींची शोधमोहीम घेण्याच्या सूचना परिमंडळ उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी पोलिसांना केल्या आहेत. त्यानुसार, चौकशीदरम्यान जुहूगाव येथे काही नायझेरियन व्यक्ती बेकायदेशीरपणे राहत असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक संजीव धुमाळ यांना मिळाली होती. त्या ठिकाणी छापा टाकण्यासाठी निरीक्षक प्रमोद तोरडमल, सहायक निरीक्षक जयंत राजूरकर, प्रशांत तायडे आदींचे पथक तयार करण्यात आले होते. शुक्रवारी मध्यरात्री या पथकाने जुहूगाव येथील साई दर्शन इमारतीमधील ओझीबिया किचन हॉटेलवर छापा टाकला. यावेळी सहा नाझेरियन व्यक्ती पोलिसांच्या हाती लागल्या. 

ओबीओरा आनीववेवा (५७) या नायझेरियन महिलेमार्फत हे बेकायदेशीर हॉटेल चालविले जात होते. हॉटेलच्या झडतीमध्ये इतर पाच नायझेरियन व्यक्ती भारतात बेकायदा वास्तव्य करताना आढळून आल्या. प्रिन्स ओको जॉन (४९), अहोमो इले हेलेन (४७), चुकुडो लुके उसलोआर (३०), नलोमारिसा कॉसमॉस चिनेन्ये (५०) व ओकेयो तूचुकोआ फिलीप (४३) अशी त्यांची नावे आहेत. या सर्वांना पारपत्र कायद्यांतर्गत ताब्यात घेऊन वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून सोळा हजार रुपये किमतीचा अवैध दारूसाठाही जप्त करण्यात आला आहे.

Web Title: Action against illegal occupants, six Nigerians detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.