accused raped on Schoolgirl after threatening to kill her brother | भावाला जीवे मारण्याची धमकी देत शाळकरी विद्यार्थिनीवर बलात्कार 
भावाला जीवे मारण्याची धमकी देत शाळकरी विद्यार्थिनीवर बलात्कार 

विमाननगर : भावाला जीवे मारण्याची धमकी देत चौदा वर्षाच्या शाळकरी विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना धानोरी येथे घडली.याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी आरोपी धनंजय मारपल्ली (वय 28,रा.धानोरी,विश्रांतवाडी) याच्याविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. 
पोलिस निरीक्षक अरूण आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही आरोपीच्या घराजवळ राहते. "तू माझ्याशी बोलत जा.मी सांगतो तसे कर असे म्हणत भावाला जीवे मारण्याची धमकी देवून तिच्यावर बलात्कार केला.याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा शोध घेत आहेत.


Web Title: accused raped on Schoolgirl after threatening to kill her brother
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.