पोलिसावर हल्ला करणाऱ्या आरोपीस केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 02:34 AM2021-04-02T02:34:51+5:302021-04-02T02:36:17+5:30

पोलिसावर हल्ला करून पळून जाणाऱ्या आरोपीस पनवेल गुन्हे शाखेने अटक केली आहे. प्रथमेश धुमाळ असे या आरोपीचे नाव आहे. 

Accused of attacking on police arrested | पोलिसावर हल्ला करणाऱ्या आरोपीस केली अटक

पोलिसावर हल्ला करणाऱ्या आरोपीस केली अटक

Next

नवीन पनवेल : पोलिसावर हल्ला करून पळून जाणाऱ्या आरोपीस पनवेल गुन्हे शाखेने अटक केली आहे. प्रथमेश धुमाळ असे या आरोपीचे नाव आहे. 
३१ जानेवारीला रात्री  नेरूळ पोलीस ठाणे येथे नेमणुकीस असलेले पोलीस शिपाई संतोष राठोड हे बालाजी मंदिर टेकडी, सेक्टर २०, नेरूळ येथून त्यांच्या वाहनाने जात असताना तेथे २० ते २५ वयोगटातील पाच जण हे आरडाओरड करीत असताना आढळून आले. त्यांच्याकडे एक विना नंबरप्लेट असलेली ॲक्टिवा मोटारसायकल होती. या मोटारसायकलबाबत पोलीस शिपाई संतोष राठोड यांनी विचारणा केली असता त्या पाच जणांनी त्यांच्यासोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्या वेळी राठोड यांनी मदतीसाठी नेरूळ बीट मार्शल यांना कॉल केला असता त्याचा राग मनात धरून पाचही जणांनी यांच्या तोंडावर वार करून त्यांना खाली पाडले. त्यानंतर  दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच राठोड यांच्या चार चाकी गाडीवर दगड टाकून गाडीच्या फाेडल्या हाेत्या.  

यबाबत नेरूळ पोलीस ठाण्यात आला होता. त्यानंतर आरोपी फरार झाले होते.  या गुन्ह्यातील आरोपी प्रथमेश योगेश धुमाळ हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. त्याच्या ठावठिकाण्याबाबत गुन्हे शाखा कक्ष २, पनवेलचे अधिकारी व कर्मचारी वेळोवेळी पाठपुरावा करीत असताना या आरोपीबाबत गुन्हे शाखा कक्ष २ चे पोलीस उपनिरीक्षक वैभव रोंगे यांना माहिती मिळाली.  

या माहितीवरून गुन्हे शाखा कक्ष २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांच्या नेतृत्वाखाली वैभव रोंगे आणि पोलीस नाईक सचिन म्हात्रे, रूपेश पाटील, दीपक डोंगरे यांनी गुन्ह्यातील आरोपी प्रथमेश योगेश धुमाळ यास खांदेश्वर रेल्वे स्टेशन रिक्षा स्टॅण्ड परिसरातून ताब्यात घेतले. या आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असल्याने त्यास पुढील कारवाईसाठी नेरूळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
 

Web Title: Accused of attacking on police arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.