The absconding accused from Nayanagar police station was arrested after a month | नयानगर पोलिस ठाण्यातील फरार आरोपीला महिन्याभरानंतर अटक

नयानगर पोलिस ठाण्यातील फरार आरोपीला महिन्याभरानंतर अटक

मीरारोड -   नया नगर पोलीस ठाण्यातील शौचालयाची एल्युमिनीयमची जाळी तोडून पळून गेलेल्या आरोपीला अखेर महिन्याभरानंतर पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

नयानगर पोलिसांच्या अटकेत असलेला समीर अकबर शेख (३०) रा. मालाड, मालवणी,  मुंबई हा २४ जानेवारीच्या पहाटे पोलीस ठाण्यातील शौचालयाची एल्युमिनियमची जाळी तोडून पळून गेला होता. पोलीस ठाण्यातून आरोपी पळून गेल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती.  आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची प्रतिष्ठा पणास लागली होती. आरोपी मात्र पोलिसांच्या हाती लागत नव्हता.  रविवारी पहाटे शेख हा मालवणी परिसरात येणार असल्याची माहीती पोलिसांना मिळाली. पोलीस पथकाने सापळा रचून शेख याला शिताफीने अटक केली.  आरोपीला ठाणे न्यायालयाने ४ मार्च पर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. 

Web Title: The absconding accused from Nayanagar police station was arrested after a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.