अपहरण केलेले बाळ पुन्हा आईच्या कुशीत; सीसीटिव्हीमुळे आरोपींचा छडा लावण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 07:05 PM2021-06-09T19:05:44+5:302021-06-09T19:08:21+5:30

Crime News : पाच जणांना अटक:  महात्मा फुले पोलीसांची कारवाई

The abducted baby again in the mother's arms; Success in nabbing accused due to CCTV | अपहरण केलेले बाळ पुन्हा आईच्या कुशीत; सीसीटिव्हीमुळे आरोपींचा छडा लावण्यात यश

अपहरण केलेले बाळ पुन्हा आईच्या कुशीत; सीसीटिव्हीमुळे आरोपींचा छडा लावण्यात यश

googlenewsNext
ठळक मुद्देमहात्मा फुले चौक पोलिसांनी केलेल्या या उल्लेखनीय तपासाचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी विशेष कौतूक केले आहे.

कल्याणकल्याण रेल्वे स्थानक परिसरातील फिरस्ता असलेल्या महिलेच्याजवळ झोपलेल्या सहा महिन्याच्या बाळाचे अपहरण करण्यात आले. दरम्यान सीसीटीव्हीच्या आधारे पोलीसांनी कसोशीने तपास करीत 48 तासात अपहरण प्रकरणातील पाच जणांना अटक केली आहे. महात्मा फुले चौक पोलिसांनी केलेल्या या उल्लेखनीय तपासाचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी विशेष कौतूक केले आहे.


पश्चिमेकडील महमद अली चौक परिसरातील शिवमंदिराचे बाजुस एका दुकानाच्या बाहेर सुनिता राजकुमार नाथ ही फिरस्ता महिला तीच्या सहा मुलांसह शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास झोपली होती. त्यावेळी मध्यरात्री 1 च्या सुमारास दोन जण त्याठिकाणी आले आणि त्यांनी तिच्या जवळ झोपलेल्या सहा महिन्याच्या जिवा नावाच्या मुलाचे अपहरण केले. मुलाची चोरी झाल्या प्रकरणी सुनिताने महात्मा फुले चौक पोलिस ठाणो गाठत तक्रार दाखल केली. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरिक्षक संभाजी जाधव यांच्यासह पोलिस अधिकारी प्रकाश पाटील, दीपक सरोदे  यांच्या पथकाने बाळाचा शोध सुरु  केला. या प्रकरणी कुठलेही धागेदोरे नसताना पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरांचा आधार घेत तपास सुरु  केला.

यात प्रारंभी मुलाला उचलून नेणा-या आणि सीसीटिव्ही कॅमेरात कैद झालेल्या विशाल त्र्यंबके आणि कुणाल कोट या दोघांना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी मुलाला पळवून कोट याची पत्नी आरती हिच्याकडे ठेवले होते. कुणाल हा त्याची पत्नी आरतीसोबत दिव्याला राहतो. तर विशाल हा कल्याण परिसरातील अटाळी भागात राहतो. चोरलेले बाळ भिवंडी येथील हिना माजीद आणि फरहान माजीद या दाम्पत्याला  1 लाख रूपयांना विकण्याच्या ते तयारीत होते. हिनाला दोन मुली आहेत. मात्र तिला मुलगा होत नसल्याने तिने मुलगा विकत घेण्याचे ठरविले होते. अटक आरोपींची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचाही तपास पोलिस करीत आहेत. अटक पाचही आरोपींना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने 14 जून र्पयत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: The abducted baby again in the mother's arms; Success in nabbing accused due to CCTV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.