9-year-old girl has sexually harrassment | खळबळजनक! नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या ९ वर्षांच्या मुलीवर अत्याचार
खळबळजनक! नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या ९ वर्षांच्या मुलीवर अत्याचार

ठळक मुद्देचंदनकुमार उजागर सहाणी (२५) या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दुकलीने दोन आठवड्यांपूर्वी तिला नशेचा पदार्थ देत, तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप मुलीने केला आहे.

मुंबई - नैसर्गिक विधीसाठी सार्वजनिक शौचालयात गेलेल्या ९ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना रे रोड परिसरात घडली. या प्रकरणी शिवडी पोलीस ठाण्यात पॉक्सो, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करत, चंदनकुमार उजागर सहाणी (२५) या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

रे रोड परिसरात ९ वर्षांची मुलगी कुटुंबीयांसोबत राहते. सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास ती सार्वजनिक शौचालयात गेली. तेथे सहाणी याने तिच्याशी जवळीक साधत तिच्यावर अत्याचार केले. दोनच्या सुमारास तिला तेथेच सोडून तो पसार झाला. मुलीने रडतच घर गाठल्यानंतर घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. तिच्या आईच्या तक्रारीवरून शिवडी पोलिसांनी पॉक्सो आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. मालाडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी मंगळवारी दोघांना अटक करण्यात आली. पीडित १४ वर्षीय मुलगी मालाड परिसरात राहते, तिच्याच घराशेजारी राहत असलेल्या दुकलीने दोन आठवड्यांपूर्वी तिला नशेचा पदार्थ देत, तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप मुलीने केला आहे.

Web Title: 9-year-old girl has sexually harrassment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.