गळा चिरून ६० वर्षीय महिलेची केली हत्या, घरात रक्ताच्या थारोळ्यात पडला होता मृतदेह 

By पूनम अपराज | Published: December 25, 2020 09:40 PM2020-12-25T21:40:37+5:302020-12-25T21:41:02+5:30

Murder : तपासणीनंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला. एसपी रोहन प्रमोद यांनीही घटनास्थळी पोहोचून चौकशी केली.

A 60-year-old woman was strangled to death and her body was covered in blood in the house | गळा चिरून ६० वर्षीय महिलेची केली हत्या, घरात रक्ताच्या थारोळ्यात पडला होता मृतदेह 

गळा चिरून ६० वर्षीय महिलेची केली हत्या, घरात रक्ताच्या थारोळ्यात पडला होता मृतदेह 

Next
ठळक मुद्देउर्मिला देवी (६० वर्षे)  असे या महिलेचे नाव आहे. त्यांचा पती बच्चू सिंह हे हयात नसून त्या एत्माद्दौलाच्या मोतीमहाल येथील शंभूनगर येथे राहणाऱ्या होत्या.मृताचे चार मुलगे मुकेश, दिनेश, टीटू, प्रवीण हे सर्व वेगवेगळ्या घरात राहतात.

आग्राच्या एत्माद्दौला भागात एका वृद्ध महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आली. शुक्रवारी सकाळी महिलेचा मृतदेह घरात आढळून आला. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली आणि ते घटनास्थळी पोहोचले. तपासणीनंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला. एसपी रोहन प्रमोद यांनीही घटनास्थळी पोहोचून चौकशी केली.


उर्मिला देवी (६० वर्षे)  असे या महिलेचे नाव आहे. त्यांचा पती बच्चू सिंह हे हयात असून त्या एत्माद्दौलाच्या मोतीमहाल येथील शंभूनगर येथे राहणाऱ्या होत्या. त्यांच्या घरात एकटीच रहात होती. किराणा सामान आणि घरात म्हशी पाळायची. मृताचे चार मुलगे मुकेश, दिनेश, टीटू, प्रवीण हे सर्व वेगवेगळ्या घरात राहतात.


शुक्रवारी सकाळी सहा वाजता शेजारी दूध आणण्यासाठी आणि दुकानात आणण्यासाठी पोहचले. शेजाऱ्यांनी दार ठोठावले, पण आतून काहीच आवाज आला नाही. शेजाऱ्याने दारातून डोकावताना उर्मिला देवी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळल्या. शेजाऱ्याने तातडीने तिच्या एका मुलाला याची माहिती दिली. मुलगा आल्यावर घराचा दरवाजा उघडला.

माहिती मिळताच पोलीस दलाचे प्रभारी मेयो घटनास्थळी पोहोचले. माहिती मिळताच एसपी रोहन प्रमोदही घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी श्वानपथकाला बोलवून चौकशी केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. एसपी म्हणाले की, तपास सुरू आहे. ही घटना लवकरच समोर येईल.

Web Title: A 60-year-old woman was strangled to death and her body was covered in blood in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.