गरोदर राहिल्यानंतर उघड झाला गुन्हा; १४ वर्षीय मुलीवर ६ नराधमांनी वारंवार केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 09:15 PM2021-07-22T21:15:55+5:302021-07-22T21:16:34+5:30

Rape Case : या प्रकरणाबद्दल बोलताना डीएसपी म्हणाले की, जिल्ह्यात पॉक्सोच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

6 men rape, impregnate 14-year-old girl in Tamil Nadu's Pollachi; booked | गरोदर राहिल्यानंतर उघड झाला गुन्हा; १४ वर्षीय मुलीवर ६ नराधमांनी वारंवार केला बलात्कार

गरोदर राहिल्यानंतर उघड झाला गुन्हा; १४ वर्षीय मुलीवर ६ नराधमांनी वारंवार केला बलात्कार

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसांनी सांगितले की, तपासणी दरम्यान असे आढळल मुलीवर काही अल्पवयीन मुलांसह सहा जणांनी बलात्कार केला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

तामिळनाडूतीलपोलिसांनी राज्यातील राजधानी चेन्नईपासून 540 किमी अंतरावर पोलाची येथे एका १४-वर्षाच्या मुलीवर वारंवार बलात्कार आणि तिचे  अपहरण केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींवर पॉक्सो कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या कलम ५०६ (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


जेव्हा मुलीच्या पोटात दुखण्याची तक्रार समोर आली. तेव्हा तिला रुग्णालयात नेण्यात आले, त्यावेळेची डॉक्टरांनी ती पाच महिन्यांची गरोदर असल्याचे सांगितले. त्यानंतर तिच्या पालकांनी स्थानिक पोलिसांकडे जाऊन तक्रार दिली.

पोलिसांनी सांगितले की, तपासणी दरम्यान असे आढळल मुलीवर काही अल्पवयीन मुलांसह सहा जणांनी बलात्कार केला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पोलिसांनी दावा केला आहे की, ही मुलगी एका आरोपीशी "रिलेशनशिपमध्ये" होती. असा आरोप केला जात आहे की, त्याने आणि त्याच्या मित्रांनी मुलीवर लैंगिक अत्याचार केले.

या प्रकरणाबद्दल बोलताना डीएसपी म्हणाले की, जिल्ह्यात पॉक्सोच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अलीकडच्या काळात पोलाची आणि यापूर्वी वलपराई येथे जवळपास १५ अशीच प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.

Web Title: 6 men rape, impregnate 14-year-old girl in Tamil Nadu's Pollachi; booked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.