जास्त व्याजदराचे आमिष देऊन ॲपद्वारे पाच लाखांची रक्कम उकळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 11:05 AM2021-09-18T11:05:02+5:302021-09-18T11:07:44+5:30

Cyber Crime : पाच लाख रुपयांची रक्कम चाेरट्यांनी ऑनलाइन पळविल्याचा धक्कादायक प्रकार ३० ऑगस्ट राेजी घडला.

5 lakh stolen offering high interest rates | जास्त व्याजदराचे आमिष देऊन ॲपद्वारे पाच लाखांची रक्कम उकळली

जास्त व्याजदराचे आमिष देऊन ॲपद्वारे पाच लाखांची रक्कम उकळली

Next
ठळक मुद्देसायबर पाेलिसांच्या तपासानंतर पाच लाखांची रक्कम परतपाेलीस अधीक्षक जी़ श्रीधर यांनी राबविली माेहीम

अकाेला : एखाद्या राष्ट्रीयीकृत बँकेत किंवा पतसंस्थेत पैसे डिपाॅझिट केल्यानंतर ज्याप्रमाणे व्याज देण्यात येते, अशाच प्रकारे ऑनलाइन ॲपमध्ये पैसे डिपाॅझिट केल्यानंतर जास्त व्याजदराचे आमिष देऊन अकाेल्यातील एका उच्चशिक्षित व्यक्तीची सुमारे पाच लाख रुपयांची रक्कम चाेरट्यांनी ऑनलाइन पळविल्याचा धक्कादायक प्रकार ३० ऑगस्ट राेजी घडला.

या प्रकरणाची तक्रार सायबर पाेलीस ठाण्यात हाेताच पाेलिसांनी तातडीने शाेधमाेहीम राबवून ही पाच लाखांची रक्कम परत मिळवून दिली. अकाेला शहरातील एका उच्चशिक्षित व्यक्तीने पैसे ॲपवर ऑनलाइनरीत्या डिपाॅझिट करण्यासाठी सर्च केले. त्यानंतर त्यांना विविध ॲपच्या माध्यमातून पैसे डिपाॅझिट केल्यानंतर जास्त व्याजदर देण्याचे आमिष देण्यात आले. याच आमिषाला बळी पडत या व्यक्तीने एक दाेन हजार नव्हे तर पाच लाखांची रक्कम ऑनलाइन पाठविली. त्यानंतर या ॲपचे अपडेट करण्याच्या नावाखाली आणखी पैशाची मागणी सुुरू करण्यात आली. एवढ्या माेठ्या प्रमाणात रक्कम डिपाॅझिट केल्यानंतरही आणखी पैशांची मागणी हाेत असल्याने या व्यक्तीने नॅशनल सायबर काइम पोर्टलवर तक्रार दिली. यावरून अकाेला पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी तातडीने तपास सुरू करण्याचे निर्देश दिले. सायबर पाेलिसांनी तातडीने तपास सुरू केल्यानंतर ऑनलाइन ॲपद्वारे पळविलेली रक्कम परत मिळवून दिली. ही कारवाई पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पाेलीस स्टेशनच्या पाेलीस निरीक्षक उज्ज्वला देवकर, सहायक पाेलीस निरीक्षक प्रशांत संदे, ओमप्रकाश देशमुख यांनी केली.

 

नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कमी वेळात जास्त नफा तसेच अधिक व्याजदर अशा प्रकारच्या माेबाइल किंवा संगणकावर आलेल्या याेजनांना बळी न पडता त्याची संपूर्ण शहानिशा केल्याशिवाय आर्थिक व्यवहार करू नये. तसेच ऑनलाइन ॲपद्वारे लोन घेत असाल तर सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अनेकांची फसवणूक हाेत असल्याने अशा आमिषाला बळी पडू नये़

-जी. श्रीधर,

पाेलीस अधीक्षक, अकाेला

Web Title: 5 lakh stolen offering high interest rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.