आंतरराष्ट्रीय बाईक रेसरच्या हत्येला ४ वर्षानंतर लागलं वेगळं वळण, पत्नी निघाली मास्टरमाइंड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 07:09 PM2022-05-16T19:09:01+5:302022-05-16T19:10:57+5:30

Murder of the international bike racer : यापूर्वी या प्रकरणातील आरोपी संजय कुमार आणि विश्वास एसडी त्यांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. हे दोघेही बंगळुरू येथील रहिवासी आहेत.

4 years after the murder of the international bike racer took a different turn, the wife took the mastermind | आंतरराष्ट्रीय बाईक रेसरच्या हत्येला ४ वर्षानंतर लागलं वेगळं वळण, पत्नी निघाली मास्टरमाइंड

आंतरराष्ट्रीय बाईक रेसरच्या हत्येला ४ वर्षानंतर लागलं वेगळं वळण, पत्नी निघाली मास्टरमाइंड

Next

जैसलमेर - 2018 मध्ये, जैसलमेर शहरात आयोजित इंडिया बाइक रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी बंगळुरूहून आलेल्या आंतरराष्ट्रीय बाइक रेसर  अस्बाक मौन च्या हत्येप्रकरणी फरार पत्नी सुमेरा परवेझ हिला सायबर सेलच्या मदतीने बंगळुरू येथून अटक करण्यात आली आहे. यापूर्वी या प्रकरणातील आरोपी संजय कुमार आणि विश्वास एसडी त्यांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. हे दोघेही बंगळुरू येथील रहिवासी आहेत. 

काय प्रकरण होते
जैसलमेरचे एसपी भंवर सिंह नाथवत यांनी सांगितले की, मूळच्या केरळ हॉल बंगळुरू येथील रहिवासी असलेल्या सुमेरा परवेझने 18 ऑगस्ट 2018 रोजी शाहगढ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. ज्यामध्ये तिने सांगितले की, जैसलमेरमध्ये आयोजित बाईक रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी तिचा पती अस्बाक मौन हे त्याचे मित्र संजय कुमार, विश्वास आणि अब्दुल साबीर यांच्यासह जैसलमेरला आले होते. 16 ऑगस्ट रोजी घाटात सरावासाठी गेलेल्या अस्बाकचा वाळवंटात भूक आणि तहानने मृत्यू झाला. अहवालावरून गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.

मुलाचा अपघात झाल्याचा आईला संशय
दुसरीकडे, मृत अस्बाक मौनची आई आणि भावाने अपघातात मृत्यू झाल्याची शंका व्यक्त करणारी तक्रार मांडली. त्याचवेळी पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये डॉक्टरांनी अस्बाकचा मृत्यू मानेला मार लागल्याने झाल्याचे सांगितले. पोलिसांनी बारकाईने तपास केला असता हे प्रकरण खुनाचे असल्याचे निष्पन्न झाले. घटनेच्या 3 वर्षांनंतर, 2021 मध्ये, पोलिसांनी घटनेचा खुलासा केला आणि मृताचे दोन मित्र संजय कुमार आणि विश्वास एसडी यांना अटक केली. मात्र मृताची पत्नी पळून गेली.
 

मृताची पत्नी सुमेरा परवेझ आणि अब्दुल साबीर यांच्याविरुद्ध २९९ सीआरपीसी अंतर्गत आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. दोघांच्या शोधात अनेकवेळा पथक पाठवले, पण यश मिळाले नाही. या घटनेची गंभीर दखल घेत एसपी भंवर सिंग यांनी नवीन टीम तयार केली आणि विशेष सूचना देऊन सायबर सेलचे प्रभारी भीमराव सिंग यांना बंगळुरूला पाठवले. ज्याने आपल्या सायबर कौशल्याच्या जोरावर 13 मे रोजी मुख्य आरोपीला बंगळुरू येथून अटक केली. आरोपीस कोर्टमध्ये हजर केल्यानंतर कोठडीत पाठवण्यात आले आहे. पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत.

 

Web Title: 4 years after the murder of the international bike racer took a different turn, the wife took the mastermind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.