4-year-old girl attempt raped in Kharghar | खारघर येथे २० वर्षीय तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न 
खारघर येथे २० वर्षीय तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न 

ठळक मुद्देतरुणीने आरडाओरडा केल्यावर संबंधित इसम घटनास्थळावरून पसार झाला.  खारघर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

पनवेल - खारघर शहरात २० वर्षीय तरुणीवर अज्ञात इसमाने बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी रात्री  ९.१२ वाजता घडली .शहरातील पापडीचा पाडा याठिकाणी हा प्रकार घडला. तरुणीने आरडाओरडा केल्यावर संबंधित इसम घटनास्थळावरून पसार झाला. 

तरुणीने खारघर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यांनतर पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. खारघर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेने महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. खारघरसारख्या शहरात अशाप्रकारची घटना घडणे ही गंभीर बाब मानली जात आहे. पापडीचा पाडा या परिसरातच केंद्रीय शीघ्र कृती दलाचे केंद्र देखील आहे. 


Web Title: 4-year-old girl attempt raped in Kharghar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.