विमा कंपनीची २ कोटींची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 04:50 AM2020-10-31T04:50:58+5:302020-10-31T04:51:29+5:30

Crime News : पोलिसांनी बँकेचे माजी सीईओ रमेश पवार यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठाविली.

2 crore fraud of insurance company | विमा कंपनीची २ कोटींची फसवणूक

विमा कंपनीची २ कोटींची फसवणूक

googlenewsNext

धुळे : कर्मचाऱ्यांच्या समूह विम्याची बनावट कागदपत्रे तयार करुन बजाज अलायन्स लाईफ इन्शुरन्स कंपनीची २ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी गव्हर्न्मेंट सर्व्हंट बँकेचे (ग. स. बँक) तत्कालीन अध्यक्ष चंद्रकांत देसले, बँकेचे तत्कालीन सीईओ रमेश पवार, फेडरल फायनान्शिअल कंपनीचे संचालक वसंत निकम आणि कल्पेश जोशी यांच्याविरोधात शहर पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. 

पोलिसांनी बँकेचे माजी सीईओ रमेश पवार यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठाविली. बजाज अलायन्स लाईफ इन्शुअरन्स कंपनीचे शाखाधिकारी प्रविण बोरसे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार १ जून २०११ ते ३१ मे २०१२ या कालावधीत विमा कंपनीकडून धुळे  सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांचा समूह विमा संदीप हरदळे यांच्याकडून काढण्यात आला होता. पॉलिसीचा कालावधी संपल्यानंतर तिचे नूतनीकरण करण्यात आले नव्हते. 

Web Title: 2 crore fraud of insurance company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.