छापा टाकून ताब्यात घेतले १५ जुगारी; पोलिसांनी जप्त केला साडेसोळा हजारांचा मुद्देमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 04:51 PM2021-05-26T16:51:16+5:302021-05-26T16:52:21+5:30

15 gamblers arrested in raids : या जुगाऱ्यांकडून पोलिसांनी रोखसह १६ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

15 gamblers arrested in raids; Police confiscated sixteen and a half thousand items | छापा टाकून ताब्यात घेतले १५ जुगारी; पोलिसांनी जप्त केला साडेसोळा हजारांचा मुद्देमाल

छापा टाकून ताब्यात घेतले १५ जुगारी; पोलिसांनी जप्त केला साडेसोळा हजारांचा मुद्देमाल

Next
ठळक मुद्देचिंतामणी कॉलोनीतील रहिवासी अमोल काळे हा कॅटर्स व्यावसायिक असून त्याच्या घरात अवैधरित्या जुगार भरविल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पुलगाव ( वर्धा ) : कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु, याच संचारबंदीच्या काळात जिल्हा प्रशासनाच्या नियमांना बगल देत जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच पुलगाव पोलिसांनी चिंतामणी कॉलोनीतील एका घरी छापा टाकून तब्बल १५ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. या जुगाऱ्यांकडून पोलिसांनी रोखसह १६ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 


चिंतामणी कॉलोनीतील रहिवासी अमोल काळे हा कॅटर्स व्यावसायिक असून त्याच्या घरात अवैधरित्या जुगार भरविल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळता पोलिसांनी आपल्या हालचालिंना गती देत अमोल काळे यांच्या घरी छापा टाकला. त्यावेळी बाबाराव रामदास बलवीर, आकाश रामराव फुंडे, सचिन रमेश वरवाडे, अभिजित योगेंद्र दुबे, विशाल बबन इरपाचे, शेखर शिवलाल साखरगडे, अजय हरिश्चंद्र जाधव, प्रमोद जनार्दन आमले, चेतन रतनलाल साहू, विनोद सत्यनारायण दुबे, ओमशंकर बलकरण पांडे, तोषिफ खान बब्बूखान पठाण, हितेंद्र यादवराव सावंत, अहमद रजा खान, जिमल खान महमूद खान हे जुगार खेळताना रंगेहात पोलिसांच्या हाती लागले. या जुगाऱ्यांकडून पोलिसांनी रोख १६ हजार ४९० रुपये तसेच इतर साहित्य  असा एकूण १६ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या पंधराही जुगाऱ्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

Web Title: 15 gamblers arrested in raids; Police confiscated sixteen and a half thousand items

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.