१२ वर्षांच्या मुलाने धाडस केले, आईच्या खुन्याला खोलीत कोंडून पकडून दिले

By बाळकृष्ण परब | Published: December 31, 2020 09:48 AM2020-12-31T09:48:20+5:302020-12-31T09:50:12+5:30

Crime News : अवघ्या १२ वर्षांच्या मुलाने धाडस करून आपल्या आईची हत्या करणाऱ्या आरोपील पकडून दिल्याची घटना समोर आली आहे.

A 12-year-old boy dared to lock his mother's killer in a room | १२ वर्षांच्या मुलाने धाडस केले, आईच्या खुन्याला खोलीत कोंडून पकडून दिले

१२ वर्षांच्या मुलाने धाडस केले, आईच्या खुन्याला खोलीत कोंडून पकडून दिले

Next
ठळक मुद्देमहिलेचा पती दिल्लीमध्ये नोकरी करतो. तर ही महिला मिरत येथे चालवत होती ब्युटी पार्लर या महिलेचे गेल्या १४ वर्षांपासून जावेद नावाच्या व्यक्तीशी होते अनैतिक संबंध महिला आरोपीसोबत असलेले अनैतिक संबंध संपुष्टात आणू इच्छित होती. मात्र आरोपीला तिचे म्हणणे आवडले नाही

लखनौ - अवघ्या १२ वर्षांच्या मुलाने धाडस करून आपल्या आईची हत्या करणाऱ्या आरोपील पकडून दिल्याची घटना उत्तर प्रदेशमधील मिरत येथे घडली. या मुलाने चाकूने वार करून त्याच्या आईची हत्या करणाऱ्या आरोपीला खोलीत बंद केले. त्यानंतर पोलिसांना फोन करून बोलावून घेतले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला बेड्या ठोकल्या.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रह्मपुरी येथे राहणाऱ्या या महिलेचे गेल्या १४ वर्षांपासून जावेद नावाच्या व्यक्तीशी अनैतिक संबंध होते. सदर महिलेचा पती दिल्लीमध्ये नोकरी करतो. तर ही महिला मिरत येथे ब्युटी पार्लर चालवत होती. दरम्यान, मंगळवारी सदर महिलेचा प्रियकर असलेला जावेद घरी आला. त्यानंतर त्यांच्या भांडण झाले.

पोलिसांनी सांगितले की, सदर महिला आरोपीसोबत असलेले अनैतिक संबंध संपुष्टात आणू इच्छित होती. मात्र आरोपीला तिचे म्हणणे आवडले नाही. त्यावरून त्यांच्यात भांडण सुरू झाले. मृत महिलेचा १२ वर्षांचा मुलगा खोलीबाहेरून हे सर्व पाहत होता. त्याचदरम्यान, आईच्या खोलीत असलेल्या त्या व्यक्तीने आईवर चाकूने सपासप वार केल्याचे त्याने पाहिले. हा प्रका पाहताच या मुलाने न घाबरता खोलीचा दरवाजा बंद केला आणि पोलिसांना फोन केला.

मिरतचे एसपी (शहर) अखिलेश नारायण सिंह यांनी सांगितले की, सूचना मिळताच क्षणी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला अटक केली. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. तर आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे.

Web Title: A 12-year-old boy dared to lock his mother's killer in a room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.