लग्नाचं आमिष दाखूवन १०० महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त; तब्बल २५ कोटींची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 10:09 AM2021-10-18T10:09:32+5:302021-10-18T10:09:52+5:30

अटक करण्यात आलेला भामटा विदेशी नागरिक मॅट्रिमोनियल वेबसाइटच्या माध्यमातून महिलांशी संपर्क साधायचा. ऑनलाइनच मैत्री करायचा आणि नंतर वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून पैसे घ्यायचा

100 women cheated on pretext of marriage | लग्नाचं आमिष दाखूवन १०० महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त; तब्बल २५ कोटींची फसवणूक

लग्नाचं आमिष दाखूवन १०० महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त; तब्बल २५ कोटींची फसवणूक

Next

नवी दिल्ली : लग्न करण्याचे आश्वासन देऊन १०० पेक्षा जास्त महिलांची २५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी एक विदेशी नागरिक व त्याला या गुन्ह्यात साथ देणाऱ्या दोन जणांना अटक केली. अटक झालेल्यांची नावे लॉरेंस चिके, औदुंडे ओकुंडे आणि दीपक अशी आहेत. 

पोलीस तपासात आढळून आले की, अटक करण्यात आलेला भामटा विदेशी नागरिक मॅट्रिमोनियल वेबसाइटच्या माध्यमातून महिलांशी संपर्क साधायचा. ऑनलाइनच मैत्री करायचा आणि नंतर वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून पैसे घ्यायचा. पैसे मिळाल्यानंतर त्यांच्याशी बोलणे बंद करायचा. 
काही दिवसांपूर्वी शाहदरा जिल्ह्यातील जगतपुरी पोलीस ठाण्यात महिलेने (३५) तक्रार दिली. काही दिवसांपूर्वी तिचा मॅट्रिमोनियल वेबसाइटच्या माध्यमातून मनमीत याच्याशी तिचा संपर्क झाला होता. हळूहळू दोघांमध्ये संभाषण व चॅटिंग सुरू झाली. एके दिवशी मनमीतने या महिलेला मी संकटात सापडल्याचे सांगितले. माझे बँक खाते गोठवण्यात आले असून मला पैशांची तातडीने गरज असल्याचेही तो म्हणाला. त्यानंतर महिलेने काही पैसे त्याच्या खात्यात पाठवले. यानंतर या ना त्या कारणाने मनमीनते या महिलेकडून जवळपास १५ लाख घेतले. महिलेने तिचे सगळे दागिनेही तारण ठेवून त्याला पैसे दिले. पैसे दिल्यानंतर त्याने माझ्याशी संपर्कच तोडून टाकला, असेही महिलेने तक्रारीत म्हटले. (वृत्तसंस्था) 
 

Web Title: 100 women cheated on pretext of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.