ZIM vs PAK T20I : झिम्बाब्वेनं पाकिस्तानची लाज काढली; संपूर्ण संघाला ९९ धावांवर माघारी पाठवून मिळवला ऐतिहासिक विजय

इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वात चौकार-षटकारांची आतषबाजी होत असताना तिथे पाकिस्तान क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकामागून एक विक्रम करत आहेत, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 05:57 PM2021-04-23T17:57:11+5:302021-04-23T17:58:16+5:30

whatsapp join usJoin us
ZIM vs PAK, 2nd T20I : Pakistan bowled out for 99 runs while chasing 119 runs against Zimbabwe in the second T20I | ZIM vs PAK T20I : झिम्बाब्वेनं पाकिस्तानची लाज काढली; संपूर्ण संघाला ९९ धावांवर माघारी पाठवून मिळवला ऐतिहासिक विजय

ZIM vs PAK T20I : झिम्बाब्वेनं पाकिस्तानची लाज काढली; संपूर्ण संघाला ९९ धावांवर माघारी पाठवून मिळवला ऐतिहासिक विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वात चौकार-षटकारांची आतषबाजी होत असताना तिथे पाकिस्तान क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकामागून एक विक्रम करत आहेत. पाकिस्तान संघानं नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धची चार सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका जिंकून इतिहास रचला. आता पाकिस्तानचा संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे तेथेही पहिल्या ट्वेंटी-२०त त्यांनी विजय मिळवला. पण, दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेनं ऐतिहासिक कामगिरी करताना पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले. २००८ ते २०२१ या कालवधीत उभय संघांमध्ये १६ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामने झाले आणि त्यात पाकिस्ताननं १५ सामने जिंकले. झिम्बाब्वेचा हा पाकिस्तानवरील पहिलाच ट्वेंटी-२० विजय आहे. ( 1 - Zimbabwe have just recorded their first ever men's T20I victory over Pakistan; losing all 15 prior encounters against them. Win)

आजच्या सामन्यात पदार्पणवीर अर्षद इक्बाल ( Arshad Iqbal) याच्या बाऊन्सरवर झिम्बाब्वेचा फलंदाज तिनाशे कामुन्हुकाम्वे याच्या हॅल्मेटचे दोन तुकडे झाले. अर्षद इक्बालनं पहिल्याच सामन्यात ४ षटकांत १६ धावांत १ विकेट घेतली. त्यानं सहा प्रथम श्रेणी सामन्यांत २०, ७ लिस्ट ए क्रिकेटमध्ये ११ व २३ ट्वेंटी-२०त २९ विकेट्स घेतल्या आहेत. झिम्बाब्वेनं २० षटकांत ९ बाद ११८ धावा केल्या आहेत. तिनाशेनं सर्वाधिक ३४ धावा चोपल्या. दानिष आझीज व मोहम्मद हस्नैन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. 

प्रत्युत्तरात मोहम्मद रिझवान व कर्णधार बाबर आजम यांनी सावध खेळ केला, परंतु २१ व्या धावेवर पाकिस्तानला पहिला धक्का बसला. बाबर एकटा खिंड लढवताना दिसला. त्यानं ४५ चेंडूंत ५ चौकारांसह ४१ धावा केल्या. बाबरची विकेट पडल्यानंतर पाकिस्तानचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. दानिश अझीज ( २२) यानं संघर्ष करण्याचा प्रयत्न केला, परंतु पाकिस्ताचा संपूर्ण संघ १९.५ षटकांत ९९ धावांत तंबूत परतला. झिम्बाब्वेनं हा सामना १९ धावांनी जिंकून इतिहास घडविला. ल्युक जॉनग्वे यानं १८ धावांत ४ विकेट्स घेतल्या. रायन बर्लनंही दोन विकेट्स घेतल्या. 


 

Web Title: ZIM vs PAK, 2nd T20I : Pakistan bowled out for 99 runs while chasing 119 runs against Zimbabwe in the second T20I

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.