युवराज सिंग फॉर्मात परतला; ग्लोबल ट्वेंटी-20त 'सिक्सर किंग्स'ची आतषबाजी

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या युवराज सिंगची कॅनडा ग्लोबल ट्वेंटी-20 लीगमधील सुरुवात फार चांगली झाली नव्हती.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 12:10 PM2019-07-30T12:10:05+5:302019-07-30T12:11:41+5:30

whatsapp join usJoin us
Yuvraj Singh returns in form; Hit 45 runs in Global Twenty 20 league | युवराज सिंग फॉर्मात परतला; ग्लोबल ट्वेंटी-20त 'सिक्सर किंग्स'ची आतषबाजी

युवराज सिंग फॉर्मात परतला; ग्लोबल ट्वेंटी-20त 'सिक्सर किंग्स'ची आतषबाजी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कॅनडा : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या युवराज सिंगचीकॅनडा ग्लोबल ट्वेंटी-20 लीगमधील सुरुवात फार चांगली झाली नव्हती. पहिल्याच सामन्यात त्याला 27 चेंडूंत केवळ 14 धावा करता आल्या होत्या. पण, सोमवारी सिक्सरकिंग युवराजचा तो जुना अवतार पाहायला मिळाला.  युवीच्या फटकेबाजीच्या जोरावर टोरांटो नॅशनल संघाने 7 बाद 216 धावांचा डोंगर उभा केला. युवीनं फलंदाजीतच नव्हे तर गोलंदाजीतही आपली कमाल दाखवली. पण, संघाला विजय मिळवून देण्यात यो अपयशी ठरला.

'युनिव्हर्सल बॉस'ची वादळी खेळी; 12 षटकार व 7 चौकारांची आतषबाजी

विनिपेग हॉक्स संघाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना टोरांटो नॅशनल संघाने 19.5 षटकांत 7 बाद 216 धावा कुटल्या. चिराग सुरी व हेनरिच क्लासेन हे आघाडीचे फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर रॉड्रीगो थॉमस आणि युवराज सिंग यांनी संघाचा डाव सावरला. या जोडीनं 77 धावांची भागीदारी करताना संघाला शतकी वेस ओलांडून दिली. युवीनं 173.08च्या स्ट्राईक रेटनं 26 चेंडूंत 45 धावा चोपल्या. त्यात चार चौकार व दोन षटकारांचा समावेश होता. थॉमसने 47 चेंडूंत 65 धावा केल्या, तर किरॉन पोलार्डनं 247.62 च्या स्ट्राईक रेटनं 21 चेंडूंत 52 धावा कुटून काढल्या. त्यात 3 चौकार व 5 षटकार होते.


लक्ष्याचा पाठलाग करताना विनिपेग संघाला ख्रिस लीन व शैमन अऩ्वर यांनी दमदार सुरुवात करून दिली. लीनने 48 चेंडूंत 89 धावा केल्या, तर अन्वरने 21 चेंडूंत 43 धावा केल्या. सन्नी सोहलने 27 चेंडूंत 58 धावा करताना संघाला विजयासमीप आणले. त्यानंतर विनिपेगच्या अन्य फलंदाजांनी विजयाचे सोपस्कार पार पाडले. युवराजनं 18 धावांत 1 विकेट घेतली. विनिपेगनं 3 विकेट्सने हा सामना जिंकला. 



युवराजनं केली घाई, बाद नसतानाही परतला तंबूत, पण का?
आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि इंडियन प्रीमिअर लीगमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग पहिल्यांदाच मैदानात उतरणार होता. त्यामुळे सर्वांच्या नजरा कॅनडा टी- 20 लीगमधील युवराजच्या खेळीवर होत्या. परंतू त्याने पहिल्या सामन्यातच चाहत्यांना निराश केले. त्याने 27 चेंडूत केवळ 14 धावा केल्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत असल्याचे सोशल मीडियावर दिसून आले. पण हा सामना जास्त चर्चिला गेला कारण बाद नसतानाही युवराजने मैदान सोडले होते.

Web Title: Yuvraj Singh returns in form; Hit 45 runs in Global Twenty 20 league

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.