ट्वेंटी-20तील जलद अर्धशतकाचा विक्रम कोण मोडणार? युवराज सिंगनं सांगितली दोन नावं

007च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात युवीनं 12 चेंडूंत अर्धशतक झळकावलं होतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 03:47 PM2020-05-13T15:47:00+5:302020-05-13T15:48:02+5:30

whatsapp join usJoin us
Yuvraj Singh Names Two Indian Batsmen Who Can Score The Fastest Fifty In T20 Internationals svg | ट्वेंटी-20तील जलद अर्धशतकाचा विक्रम कोण मोडणार? युवराज सिंगनं सांगितली दोन नावं

ट्वेंटी-20तील जलद अर्धशतकाचा विक्रम कोण मोडणार? युवराज सिंगनं सांगितली दोन नावं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगनं बुधवारी इंस्टाग्रामवरून मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी त्यानं 2007च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वात जलद अर्धशतकांचा विक्रम मोडण्याची क्षमता असलेल्या दोन भारतीय खेळाडूंची नावे सांगितली.  2007च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात युवीनं 12 चेंडूंत अर्धशतक झळकावलं होतं. याच सामन्यात त्यानं स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात सहा षटकार खेचले होते. आंतरष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमधील ते सर्वात जलद अर्धशतक ठरलं होतं. 

महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत Rohit Sharmaचं महत्त्वाचं विधान

गतवर्षी निवृत्ती घेणाऱ्या युवीनं सांगितली की, ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्स हा विक्रम तोडू शकले असते, परंतु आताच्या फळीतील फलंदाजांबद्दल विचाराल, तर हार्दिक पांड्या व लोकेश राहुल हा विक्रम मोडतील. लोकेशनं इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल) 14 चेंडूंत 50 धावा केल्या होत्या. त्यामुळे लोकेश आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20तील विक्रमही मोडेल, असं युवीला वाटतं. 

युवी म्हणाला,''ख्रिस गेलएबी डिव्हिलियर्स सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम मोडू शकतील असं मला वाटलं होतं. लोकेशनं आयपीएलमध्ये 14 चेंडूंत 50 धावा केल्या आहेत. पण, आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये दिग्गज गोलंदाजांचा सामना करणे तितकं सोपं नाही. तरीही लोकेश व हार्दिक यांच्यात तो विक्रम मोडण्याची क्षमता आहे.''

युवीनं वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेल्या संघावरही टीका केली. ''2019च्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी केलेली निवड ही धक्कादायक होती. 5 वन डे सामना खेळलेल्या खेळाडूला तुम्ही मधल्या फळीची जबाबदारी देता. लोकांना प्रश्न विचारायला हवेत.''

यावेळी त्यानं टीम इंडियाच्या फलंदाज प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संजय बांगर यांच्या जागी राठोड यांची फलंदाजी  प्रशिक्षक म्हणून निवड केली गेली. युवी म्हणाला,''राठोड माझा मित्र आहे. ट्वेंटी-20 जनरेशनच्या खेळाडूंना तो मदत करू शकतो, असं तुम्हाला वाटतं का? त्या लेव्हलचं क्रिकेट तो खेळला आहे का?'' 2007 ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आणि 2011च्या वन डे वर्ल्ड कप संघाचा सदस्य असलेल्या युवीनं इंस्टाग्राम चॅटवर हे प्रश्न उपस्थित केले. राठोड यांनी 1996-97 या कालावधीत सहा कसोटी आणि सात वन डे सामने खेळले.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

आत्मनिर्भर भारत'; पंतप्रधान मोदींचा अखेरच्या चेंडूवर षटकार; बबिता फोगाटचं ट्विट व्हायरल

... तर हार्दिक पांड्याला 10 वाजता ड्रिंक्ससाठी घेऊन गेलो असतो; रवी शास्त्रींना Yuvraj Singhचा सल्ला

'माझ्या घरावर दगडफेक करण्यात आली होती'; तो प्रसंग आठवून युवराज सिंग भावुक

सानिया मिर्झा ट्राऊझर? सोशल मीडियावर होतेय व्हायरल; Video पाहून व्हाल लोटपोट

वीरेंद्र सेहवागच्या प्रश्नांवर Sunny Leoneची जोरदार फटकेबाजी; दोघांनी केलेली एकत्रित कॉमेंट्री

बांगलादेशच्या क्रिकेटपटूला कोरोनाची लागण, छातीत दुखू लागल्यानं डॉक्टरांकडे धाव 

कसा असेल MI-CSKचा एकत्रित संघ?; रोहित शर्मा, सुरेश रैनानं निवडले खेळाडू

Web Title: Yuvraj Singh Names Two Indian Batsmen Who Can Score The Fastest Fifty In T20 Internationals svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.