युवा विश्वचषक क्रिकेट : भारताचा उद्या न्यूझीलंडविरुद्ध सामना

भारतीय संघाने पहिल्या लढतीत श्रीलंकेचा ९० धावांनी पराभव केल्यानंतर जपानचा १० गड्यांनी पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 11:30 PM2020-01-23T23:30:11+5:302020-01-23T23:31:01+5:30

whatsapp join usJoin us
Youth u-19 World Cup Cricket: India face New Zealand tomorrow | युवा विश्वचषक क्रिकेट : भारताचा उद्या न्यूझीलंडविरुद्ध सामना

युवा विश्वचषक क्रिकेट : भारताचा उद्या न्यूझीलंडविरुद्ध सामना

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ब्लोमफोंटेन : सलग दोन विजयांसह क्वार्टर फायनलमध्ये पोहोचलेला गत चॅम्पियन भारतीय संघ शुक्रवारी आयसीसी अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत ‘अ’ गटातील अखेरच्या लढतीत न्यूझीलंडविरुद्ध विजयाची लय कायम राखण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.
चार गुणांसह गटात अव्वल स्थानावर असलेल्या भारतीय संघाने पहिल्या लढतीत श्रीलंकेचा ९० धावांनी पराभव केल्यानंतर जपानचा १० गड्यांनी पराभव केला. प्रियम गर्गच्या नेतृत्वाखालील संघ न्यूझीलंडविरुद्ध प्रबळ दावेदार म्हणून उतरणार आहे. दुसºया बाजूचा विचार करता न्यूझीलंडला जपानविरुद्ध गुण शेअर करावा लागला. कारण ही लढत पावसामुळे रद्द झाली. न्यूझीलंडने श्रीलंकेचा पराभव करीत अंतिम ८ मध्ये स्थान मिळवले.
न्यूझीलंड २०१८ मध्ये आपल्या यजमानपदाखाली झालेल्या अंडर-१९ विश्वकप स्पर्धेत आठव्या स्थानी होती. आता ते आपल्या सीनिअर संघाप्रमाणे कामगिरी करण्यास प्रयत्नशील आहे. सीनिअर संघाने २०१९ च्या विश्वकप स्पर्धेत अंतिम फेरीत दाखल झाला होता.
भारतातर्फे गेल्या लढतीत लेग स्पिनर रवी बिश्नोईने चार तर वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागीने तीन व आकाश सिंगने दोन बळी घेतले होते. चारवेळचा चॅम्पियन संघाने जपानचा डाव ४१ धावांत गुंडाळला होता. अंडर-१९ विश्वकप स्पर्धेत ही दुसरी निचांकी व अंडर-१९ क्रिकेट इतिहासातील तिसरी निचांकी धावसंख्या आहे.
कर्णधार गर्गने आपल्या गोलंदाजांची प्रशंसा करताना म्हटले होते की,‘या कामगिरीमुळे मी खूश आहे. फिरकीपटूंची कामगिरी उल्लेखनीय ठरली, पण वेगवान गोलंदाजांना यापेक्षा सरस कामगिरी करता आली असती. आम्ही प्रत्येक लढतीत योजनाबद्ध खेळ करू.’
फलंदाजीमध्ये यशस्वी जयस्वाल, गर्ग व यष्टिरक्षक ध्रुव जुरेल यांची पहिल्या लढतीत कामगिरी शानदार झाली होती. दुसºया सामन्यात तिलक वर्मा व सिद्धेश वीरने चांगली खेळी केली. भारतीय संघाला मात्र अद्याप मजबूत संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागलेले नाही. (वृत्तसंस्था)
------------------
प्रतिस्पर्धी संघ
भारत अंडर -१९ : प्रियम गर्ग (कर्णधार), आकाश सिंग, अथर्व अंकोलेकर, शुभाग हेगडे, यशस्वी जयस्वाल, धु्रव जुरेल, कार्तिक त्यागी, कुमार कुशाग्र, सुशांत मिश्रा, विद्याधर पाटील, रवी बिश्नोई, शाश्वत रावत, दिव्यांश सक्सेना, तिलक वर्मा, सिद्धेश वीर, दिव्यांश जोशी.
न्यूझीलंड अंडर-१९ : जेस्से ताशकोफ (कर्णधार), आदित्य अशोक, क्रिस्टिन क्लार्क, हेडन डिकसन, जोय फिल्ड, डेव्हिड हेनकोक, सायमन किने, फर्ग्युस लेलमॅन, निकोलस लिडस्टोन, रिस मारियू, विलियम ओरुके, बेन पोमारे, क्विन सुंडे, बॅकहम व्हीलर ग्रिनाल, ओली व्हाईट.
-----------------
सामना : भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० पासून.

Web Title: Youth u-19 World Cup Cricket: India face New Zealand tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.