WTC Final 2021 IND vs NZ : न्यूझीलंडची विकेट काही पडेना अन् विराट कोहलीचा डान्स काही थांबेना, पाहा भन्नाट Video

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : न्यूझीलंड संघानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलच्या तिसऱ्या दिवशी सामन्यावरील पकड मजबूत केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 08:18 PM2021-06-20T20:18:02+5:302021-06-20T20:18:28+5:30

whatsapp join usJoin us
WTC final 2021 Ind vs NZ Test : Some Punjabi Dance steps by Virat Kohli, Watch Video | WTC Final 2021 IND vs NZ : न्यूझीलंडची विकेट काही पडेना अन् विराट कोहलीचा डान्स काही थांबेना, पाहा भन्नाट Video

WTC Final 2021 IND vs NZ : न्यूझीलंडची विकेट काही पडेना अन् विराट कोहलीचा डान्स काही थांबेना, पाहा भन्नाट Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देभारताची 3 बाद 146 अशी अवस्था होती अन् पाहता पाहता 71 धावांत 7 फलंदाज माघारी परतले.

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : न्यूझीलंड संघानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलच्या तिसऱ्या दिवशी सामन्यावरील पकड मजबूत केली. 3 बाद 146 धावांवरून आजच्या दिवसाची सुरूवात करणाऱ्य़ा टीम इंडियाचा डाव किवी गोलंदाजांनी 217 धावांवर गुंडाळला. टॉम लॅथम व डेव्हॉन कॉनवे यांनी सावध सुरूवात केली आहे. किवी फलंदाज सामन्यावरील पकड हळूहळू मजबूत करत असताना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली मैदानावर भांगडा करताना दिसला. ( Some Punjabi Dance steps by Virat Kohli) त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. 

इथे सुरूय फायनल मॅच अन् आर अश्विननं निवृत्तीबाबत केली मोठी घोषणा!

कायले जेमिन्सननं पाच विकेट्स घेत टीम इंडियाचे कंबरडे मोडले. WTC Final मध्ये एकाच डावात पाच विकेट्स घेणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला. आयपीएलमध्ये RCBकडून खेळणाऱ्या कायले जेमिन्सननं टीम इंडियाला हा धक्का दिला. त्यानं विराटला 44 धावांवर पायचीत केलं अन् टीम इंडियाला कालच्या धावसंख्येत 3 धावांचीच भर घालता आली आहे. रिषभ पंतला 22 चेंडूंत 4 धावाच करता आल्या. अजिंक्य रहाणेकडून अपेक्षा होत्या, परंतु घातकी फटका मारून तो 49 धावांवर माघारी परतला. आर अश्विननं फटाफट 22 धावा केल्या, परंतु तोही टीम साऊदीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. 

लंच ब्रेकनंतरच्या पहिल्याच षटकात जेमिन्सननं इशांत शर्मा व जसप्रीत बुमराह यांना बाद केले. मोहम्मद शमीनं खणखणीत चौकार मारून सुरुवात केली. पण, ट्रेंट बोल्टनं पुढच्याच षटकात जडेजाला ( 15) बाद करून भारताचा पहिला डाव 217 धावांत गडगडला. ( Five-wicket haul for young Kyle Jamieson, Indian innings end with just 217) 

पाहा विराटचा भांगडा..


 

Web Title: WTC final 2021 Ind vs NZ Test : Some Punjabi Dance steps by Virat Kohli, Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.