WTC Final 2021 IND vs NZ : विराट कोहलीच्या सहकाऱ्यानं केला घात, टीम इंडियाला बसला मोठा धक्का  

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : भारतीय संघाची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील तिसऱ्या दिवसाची सुरुवात निराशाजन राहिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 03:50 PM2021-06-20T15:50:07+5:302021-06-20T15:50:22+5:30

whatsapp join usJoin us
WTC final 2021 Ind vs NZ Test : Kyle Jamieson removes Virat Kohli early on Day 3, Kohli on LBW for 44 | WTC Final 2021 IND vs NZ : विराट कोहलीच्या सहकाऱ्यानं केला घात, टीम इंडियाला बसला मोठा धक्का  

WTC Final 2021 IND vs NZ : विराट कोहलीच्या सहकाऱ्यानं केला घात, टीम इंडियाला बसला मोठा धक्का  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : भारतीय संघाची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील तिसऱ्या दिवसाची सुरुवात निराशाजन राहिली. पावसामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळही अर्धा तास उशीरानं सुरू झाला आणि त्यानंतर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनं दिवसाच्या चौथ्याच षटकात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याला माघारी पाठवले. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये RCBकडून खेळणाऱ्या कायले जेमिन्सननं टीम इंडियाला हा धक्का दिला. त्यानं विराटला 44 धावांवर पायचीत केलं अन् टीम इंडियाला कालच्या धावसंख्येत 3 धावांचीच भर घालता आली आहे. विराटनं DRS घेतला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही.

 
दरम्यान, रोहित शर्मा व शुबमन गिल यांची टीम इंडियाला साजेशी सुरूवात करून दिली, परंतु न्यूझीलंडचे गोलंदाज कायले जेमिन्सन व निल वॅगनर यांनी दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले. रोहित ( 34) व शुबमन ( 28) यांची 62 धावांची भागीदारी कायले जेमिन्सननं संपुष्टात आणली. विराट व पुजारा यांनी संयमी खेळ करताना टीम इंडियाचा डाव सावरला होता. पूजारानं  54 चेंडूंत दोन चौकारांसह 8 धावा केल्या. पुजारा व विराट यांनी तिसऱ्या विकेटसाठी 95 चेंडूंत 25 धावांची भागीदारी केली.  विराट व अजिंक्यनं चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना दुसऱ्या दिवशी भारताची धावसंख्या 3 बाद 146 धावांपर्यंत नेली. विराट कोहली 44, तर अजिंक्य रहाणे 29 धावांवर खेळत आहेत. भारतीय फलंदाजांनी 64.4 षटकांत 2.25च्या सरासरीनं धावा केल्या.

Web Title: WTC final 2021 Ind vs NZ Test : Kyle Jamieson removes Virat Kohli early on Day 3, Kohli on LBW for 44

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.