WTC Final 2021 IND vs NZ : भारतीयांचं चुकीचं वागणं; विराट कोहलीची विकेट घेतली म्हणून किवी गोलंदाजाला शिव्या!

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : 3 बाद 146 धावांवरून आजच्या दिवसाची सुरूवात करणाऱ्य़ा टीम इंडियाचा डाव किवी गोलंदाजांनी 217 धावांवर गुंडाळला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 08:50 PM2021-06-20T20:50:48+5:302021-06-20T20:51:14+5:30

whatsapp join usJoin us
WTC final 2021 Ind vs NZ Test : Indian fans abuse Kyle Jamieson on his Instagram posts after he gets Virat Kohli’s wicket | WTC Final 2021 IND vs NZ : भारतीयांचं चुकीचं वागणं; विराट कोहलीची विकेट घेतली म्हणून किवी गोलंदाजाला शिव्या!

WTC Final 2021 IND vs NZ : भारतीयांचं चुकीचं वागणं; विराट कोहलीची विकेट घेतली म्हणून किवी गोलंदाजाला शिव्या!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : न्यूझीलंड संघानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलच्या तिसऱ्या दिवशी सामन्यावरील पकड मजबूत केली. 3 बाद 146 धावांवरून आजच्या दिवसाची सुरूवात करणाऱ्य़ा टीम इंडियाचा डाव किवी गोलंदाजांनी 217 धावांवर गुंडाळला. टॉम लॅथम व डेव्हॉन कॉनवे यांनी सावध सुरूवात केली आहे. टी ब्रेकपर्यंत किवींच्या सलामीवीरांनी 36 धावा जोडल्या आहेत. दरम्यान, या सामन्यात 31 धावांत 5 विकेट्स घेणाऱ्या कायले जेमिन्सनला भारतीय फॅन्स शिव्या देत आहेत.

जेमिन्सननं विराट कोहलीची विकेट घेतल्याचा राग ते सोशल मीडियावर शिव्या व अपशब्द वापरून काढत आहेत.
कायले जेमिन्सननं पाच विकेट्स घेत टीम इंडियाचे कंबरडे मोडले. WTC Final मध्ये एकाच डावात पाच विकेट्स घेणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला. आयपीएलमध्ये RCBकडून खेळणाऱ्या कायले जेमिन्सननं टीम इंडियाला हा धक्का दिला. त्यानं विराटला 44 धावांवर पायचीत केलं अन् टीम इंडियाला कालच्या धावसंख्येत 3 धावांचीच भर घालता आली आहे. रिषभ पंतला 22 चेंडूंत 4 धावाच करता आल्या. अजिंक्य रहाणेकडून अपेक्षा होत्या, परंतु घातकी फटका मारून तो 49 धावांवर माघारी परतला. आर अश्विननं फटाफट 22 धावा केल्या, परंतु तोही टीम साऊदीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. 

लंच ब्रेकनंतरच्या पहिल्याच षटकात जेमिन्सननं इशांत शर्मा व जसप्रीत बुमराह यांना बाद केले. मोहम्मद शमीनं खणखणीत चौकार मारून सुरुवात केली. पण, ट्रेंट बोल्टनं पुढच्याच षटकात जडेजाला ( 15) बाद करून भारताचा पहिला डाव 217 धावांत गडगडला. 


 

Web Title: WTC final 2021 Ind vs NZ Test : Indian fans abuse Kyle Jamieson on his Instagram posts after he gets Virat Kohli’s wicket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.