WTC Final 2021 IND vs NZ : चौथ्या दिवसाचा खेळ सुरू व्हायची वाट पाहताय?, त्याआधी BCCIनं दिलेत महत्त्वाचे अपडेट्स वाचा!

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये न्यूझीलंडने दोन दिवस वर्चस्व गाजवल्याचे पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 02:51 PM2021-06-21T14:51:24+5:302021-06-21T15:07:08+5:30

whatsapp join usJoin us
WTC final 2021 Ind vs NZ Test : Current situation of Southampton, looks like won't start on time | WTC Final 2021 IND vs NZ : चौथ्या दिवसाचा खेळ सुरू व्हायची वाट पाहताय?, त्याआधी BCCIनं दिलेत महत्त्वाचे अपडेट्स वाचा!

WTC Final 2021 IND vs NZ : चौथ्या दिवसाचा खेळ सुरू व्हायची वाट पाहताय?, त्याआधी BCCIनं दिलेत महत्त्वाचे अपडेट्स वाचा!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देरॉस टेलर व केन विलियम्सन ही अनुभवी जोडी मैदानावर असताना अंधुक प्रकाशामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. किवींच्या 2 बाद 101 धावा झाल्या असून ते 116 धावांनी पिछाडीवर आहेत.

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये न्यूझीलंडने दोन दिवस वर्चस्व गाजवल्याचे पाहायला मिळत आहे. कायले जेमिन्सननं पाच विकेट्स घेत भारताचा पहिला डाव २१७ धावांवर गुंडाळला. त्यानंतर टॉम लॅथम व डेव्हॉन कॉनवे या किवी सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांची कसोटी पाहिली. तिसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडनं २ बाद १०१ धावा केल्या आहेत आणि चौथ्या दिवशी ११६ धावांची पिछाडी भरून काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण, चौथ्या दिवसाची आतुरतेनं वाट पाहणाऱ्या क्रिकेट चाहत्यांसाठी बीसीसीआयनं मोठे अपडेट्स दिले आहेत. WTC Final 2021, WTC Final 2021, Ind vs NZ Test Final

तिसऱ्या दिवशी 3 बाद 146 धावांवरून सुरूवात करणाऱ्य़ा टीम इंडियाचा डाव किवी गोलंदाजांनी 217 धावांवर गुंडाळला. त्यानंतर टॉम लॅथम व डेव्हॉन कॉनवे यांनी 70 धावांची सलामी देताना टीम इंडियाला हैराण केले. र अश्विननं भारताला पहिली विकेट मिळवून दिली. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 25 वेळा पहिली विकेट घेण्याच्या अनिल कुंबळे यांच्या विक्रमाशी अश्विननं बरोबरी केली. इशांत शर्मानं किवीला दुसरा झटका दिला. खेळपट्टीवर सेट झालेल्या कॉनवेला त्यानं बाद केलं, मोहम्मद शमीनं सुरेख झेल टिपला. कॉनवेनं 153 चेंडूंत 6 चौकारांसह 54 धावांची खेळी केली. रॉस टेलर व केन विलियम्सन ही अनुभवी जोडी मैदानावर असताना अंधुक प्रकाशामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. किवींच्या 2 बाद 101 धावा झाल्या असून ते 116 धावांनी पिछाडीवर आहेत.  WTC final 2021, Ind vs Nz WTC Final Today

चौथ्या दिवसाचा खेळ होणे अवघड...
बीसीसीआयनं ट्विट केलेल्या फोटोत साऊदॅम्प्टन येथे अजूनही पाऊस पडत असल्याचे दिसत आहे. बीसीसीआयनं चौथ्या दिवसाचा खेळ उशीरानं सुरू होईल असे म्हटले असले तरी आजचा दिवस पावसातच वाया जाणार असल्याचे जाणकार सांगत आहेत. आर अश्विनच्या पत्नीनंही तेथील व्हिडीओ पोस्ट केला आहे.  WTC Final Today, Ind Vs NZ test Score, NZ vs IND Test today


Web Title: WTC final 2021 Ind vs NZ Test : Current situation of Southampton, looks like won't start on time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.