एबी डिव्हिलियर्स ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळणार? आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस म्हणतो...

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो यानं काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केलेल्या निवृत्तीचा निर्णय मागे घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 04:18 PM2019-12-17T16:18:14+5:302019-12-17T16:19:47+5:30

whatsapp join usJoin us
Will AB de Villiers return for South Africa at the T20 World Cup? Proteas captain Faf du Plessis says... | एबी डिव्हिलियर्स ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळणार? आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस म्हणतो...

एबी डिव्हिलियर्स ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळणार? आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस म्हणतो...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो यानं काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केलेल्या निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्यासाठी तयार असल्याचं सांगून ब्राव्होनं निवृत्तीच्या निर्णयातून यू टर्न मारला. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सनेही ऑस्ट्रेलियात होणारा वर्ल्ड कप खेळावा अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. दक्षिण आफ्रिका संघाचे नवनिर्वाचित प्रशिक्षक आणि माजी खेळाडू मार्क बॉउचर यानेही डिव्हिलियर्सनं निवृत्तीच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे मत व्यक्त केले होते. आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसनेही मंगळवारी याबाबत महत्त्वाचे विधान केले. 

डिव्हिलियर्सनं गेल्या वर्षी मे महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानं 2019च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर निवृत्तीचा निर्णय मागे घेतला होता आणि निवडीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले होते. पण, निवड समितीनं त्याची निवड केली नाही. पण, आता ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या निमित्तानं पुन्हा डिव्हिलियर्सच्या पुनरागमनाची चर्चा सुरू झाली आहे. फॅफ ड्यू प्लेसिस म्हणाला,''एबीनं वर्ल्ड कप खेळावा अशी लोकांची इच्छा आहे आणि माझ्याही मनात तेच आहे. त्यासाठी गेल्या दोन व तीन महिने त्याच्याशी चर्चा सुरू आहे. त्यातून काय निकाल लागतो, हे लवकरच कळेल.''  

दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी गेल्या आठवड्यात डिव्हिलियर्सबद्दल मत व्यक्त केलं होतं की,''वर्ल्ड कप स्पर्धेला सामोरे जाताना तुमच्याकडे सर्वोत्तम खेळाडू असायलाच हवा. एबी मला आमचा सर्वोत्तम खेळाडू वाटतो, तर मग त्याच्याशी मी चर्चा का करू नये?''

दक्षिण आफ्रिकेचा संघ पुढच्या वर्षी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध ट्वेंटी-20 मालिका खेळणार आहे. त्यानंतर वेस्ट इंडिज आणि श्रीलंका दौरा होण्याची शक्यता आहे. डिव्हिलियर्स या मालिकेत खेळण्याची शक्यता कमीच आहे. कारण, या दरम्यान आयपीएल स्पर्धा होणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेबाबतचा निर्णय घेण्यासाठी डिव्हिलियर्सला पुरेसा वेळ देण्यात येणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या MSL लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत डिव्हिलियर्सनं ( 325) तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं 46.42च्या सरासरीनं या धावा केल्या आहेत आणि त्यात चार अर्धशतकांचा समावेश आहे. 

Web Title: Will AB de Villiers return for South Africa at the T20 World Cup? Proteas captain Faf du Plessis says...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.