टीम इंडियाला मोठा धक्का; यष्टिरक्षक वृद्धीमान साहावर होणार शस्त्रक्रिया

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेत टीम इंडियानं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. या मालिकेतील दुसरा सामना ऐतिहासिक ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 01:52 PM2019-11-27T13:52:46+5:302019-11-27T13:53:04+5:30

whatsapp join usJoin us
Wicketkeeper Wriddhiman Saha sustained a fracture on his right ring finger during the Pink ball Test in Kolkata  | टीम इंडियाला मोठा धक्का; यष्टिरक्षक वृद्धीमान साहावर होणार शस्त्रक्रिया

टीम इंडियाला मोठा धक्का; यष्टिरक्षक वृद्धीमान साहावर होणार शस्त्रक्रिया

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेत टीम इंडियानं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. या मालिकेतील दुसरा सामना ऐतिहासिक ठरला. कोलकाताच्या इडन गार्डनवर टीम इंडियानं प्रथमच डे नाइट कसोटी सामना खेळला आणि अवघ्या अडीच दिवसांत तो जिंकलाही. भारतानं हा सामना एक डाव व 46 धावांनी जिंकला. भारतानं या विजयासह सलग चार कसोटी सामन्यांत डावानं विजय मिळवण्याचा विक्रम नावावर केला. या सामन्यानंतर भारतीय संघाला मोठा धक्का बसला. भारतीय संघाचा यष्टिरक्षक वृद्धीमान साहा दुखापतग्रस्त झाला आहे आणि आता त्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया होणार आहे.

बांगलादेशनंतर भारतीय संघ 6 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-20 मालिकेत वेस्ट इंडिजचा सामना करणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनने माघार घेतली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेच्या सामन्यात धवननं स्वतःला दुखापतग्रस्त करून घेतलं आणि आता विंडीज मालिकेत त्याच्या जागी संघात संजू सॅमसनचा समावेश करून घेतला. या बातमी पाठोपाठ साहाच्या दुखापतीचे वृत्त भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) जाहीर केले. 


बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत साहाच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली. बीसीसीआयच्या वैद्यकिय टिमनं त्याला शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे. त्यासाठी तो मुंबईत आला असून आज त्याच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्यानंतर तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तंदुरुस्तीसाठी दाखल होणार आहे.  

डे नाइट सामन्यात साहाने एक पराक्रम केल्याचे पाहायला मिळाले आहे. या सामन्यात इशांतच्या गोलंदाजीवर वृद्धिमानने एक अप्रतिम झेल टिपत बांगलादेशच्या महमुदुल्लाहाला बाद केले. हा झेल पकडल्यावर भारताचा कर्णधार विराट कोहलीही चांगलाच खूष झाल्याचे पाहायला मिळाले. साहाने हा अप्रतिम झेल पकडला आणि तो कौतुकाचा धनी ठरला. पण या झेलबरोबर त्याले एक अनोखे शतकही साजरे केले. या झेलसह विकेट्स मागे शंभर बळी मिळवण्याचा पराक्रम साहाने यावेळी केला आहे.

Web Title: Wicketkeeper Wriddhiman Saha sustained a fracture on his right ring finger during the Pink ball Test in Kolkata 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.