'तू इतका पाकिस्तानी विरोधी का आहेस?'; नेटिझन्सच्या प्रश्नावर गौतम गंभीरचं लय भारी उत्तर...

ट्विटरवर गंभीरनं Ask Me Anything मधून नेटिझन्सना काही विचारण्यास सांगितले.

By स्वदेश घाणेकर | Published: October 7, 2020 08:00 PM2020-10-07T20:00:48+5:302020-10-07T20:01:20+5:30

whatsapp join usJoin us
'Why are you so anti-Pakistan?' - Twitter user asks Gautam Gambhir, gets a fitting response from ex-cricketer | 'तू इतका पाकिस्तानी विरोधी का आहेस?'; नेटिझन्सच्या प्रश्नावर गौतम गंभीरचं लय भारी उत्तर...

'तू इतका पाकिस्तानी विरोधी का आहेस?'; नेटिझन्सच्या प्रश्नावर गौतम गंभीरचं लय भारी उत्तर...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोरोना व्हायरसच्या संकटात सेलिब्रेटी आणि प्रसिद्ध क्रीडापटू सोशल मीडियाच्या माध्यमातून आपापल्या चाहत्यांच्या संपर्कात होते. भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ( Gautam Gambhir) हा सोशल मीडियावर फार अॅक्टीव्ह होता. त्यानं कोरोना संकटात अनेकांना आर्थिक मदतही केली. भारतीय जनता पार्टीचा खासदार असलेल्या गंभीरनं दिल्ली सरकारलाही आर्थिक मदत केली. नुकतंच त्यानं सोशल मीडियावर  Ask Me Anything च्या माध्यमातून नेटिझन्सच्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली.  

ट्विटरवर गंभीरनं Ask Me Anything मधून नेटिझन्सना काही विचारण्यास सांगितले. याच सेशनमध्ये त्याला एका नेटिझन्सने, तू इतका पाकिस्तानी विरोधी का? असा प्रश्न विचारला. त्यावर गंभीरनं भन्नाट उत्तर दिलं. तो म्हणाला,''मी नाही आणि भारतीयही असतील असं मला वाटत नाही. पण. जेव्हा आमच्या जवानांचे आयुष्य आणि अन्य काही यात निवड करण्याची वेळ येते. तेव्हा आम्ही सर्व भारतीय एकाच बाजूला उभे राहिलेलो दिसू.''  


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गौतम गंभीरनं अनेक अविस्मरणीय खेळी खेळल्या. 2007 चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आणि 2011च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील विजयी संघाचा तो सदस्य होता. त्यानं ५८ कसोटीत ४१५४ धावा केल्या आहेत. १४७ वने आणि ३७ ट्वेंटी-20 सामन्यांत त्याच्या नावावर अनुक्रमे ५२३८ व ९३२ धावा आहेत.  

Web Title: 'Why are you so anti-Pakistan?' - Twitter user asks Gautam Gambhir, gets a fitting response from ex-cricketer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.