Who got more money in IPL ms Dhoni, Rohit sharma, or virat Kohli | आयपीएलमध्ये कोण ठरला सर्वात मोठा धनी; रोहित, कोहली की धोनी
आयपीएलमध्ये कोण ठरला सर्वात मोठा धनी; रोहित, कोहली की धोनी

मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये आयपीएल पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले. आयपीएलमधील संघांनी आपल्याला नकोश्या झालेल्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवत संघबांधणी केली. पण आता तर आयपीएलमध्ये सर्वात जास्त महागडा खेळाडू कोण, हे पुढे आले आहे.

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने तीनदा संघाला जेतेपद पटकावून दिले आहे. मुंबई इंडियन्सचा रोहित शर्माही संघासाठी लकी ठरला आहे. पण आतापर्यंतच्या १२ हंगामांमध्ये कोहलीला एकदाही आरसीबीसाठी जेतेपद पटकावता आलेले नाही.

भारताचा कर्णधार म्हणून कोहली यशस्वी ठरत असला तरी त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाला एकही जेतेपद पटकावून देता आलेले नाही. पण तरीही आरसीबीचा संघ त्याच्यावर भली मोठी रक्कम खर्च करताना दिसत आहे.

आयपीएलमध्ये सर्वात मोठा धनी कोहलीच ठरलेला दिसतो. कारण सध्याच्या घडीला कोहलीला १७ कोटी रुपये एवढे मानधन आरसीबीकडून मिळते. रोहित आणि धोनी यांना १५ कोटी एवढे मानधन मिळते.

Web Title: Who got more money in IPL ms Dhoni, Rohit sharma, or virat Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.