Video: जबराट...; ऑस्ट्रेलियाच्या जॅक फ्रेझर-मॅकगर्कनं घेतला क्रिकेट इतिहासातील सर्वात भारी कॅच

BBL 2021-22 : बिग बॅश लीगमध्ये मंगळवारी क्रिकेट इतिहासातील सर्वात भारी कॅच पाहायला मिळाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 04:38 PM2021-12-07T16:38:36+5:302021-12-07T16:39:09+5:30

whatsapp join usJoin us
What an unbelievable catch by Jake Fraser-McGurk in the Big Bash League, Watch Video | Video: जबराट...; ऑस्ट्रेलियाच्या जॅक फ्रेझर-मॅकगर्कनं घेतला क्रिकेट इतिहासातील सर्वात भारी कॅच

Video: जबराट...; ऑस्ट्रेलियाच्या जॅक फ्रेझर-मॅकगर्कनं घेतला क्रिकेट इतिहासातील सर्वात भारी कॅच

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

BBL 2021-22 : बिग बॅश लीगमध्ये मंगळवारी क्रिकेट इतिहासातील सर्वात भारी कॅच पाहायला मिळाला. मेलबर्न रेनेगाड्स व अ‍ॅडलेड स्ट्रायकर्स यांच्यातल्या सामन्यात जॅक फ्रेझर-मॅकगर्कनं घेतलेला अफलातून झेल  सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. मेलबर्नच्या ९ बाद १५३ धावांच्या प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या अ‍ॅडलेडच्या जॅक वेदरॅल्डचा हा अविश्वसनीय झेल टिपला गेला अन् जॅकनं मेलबर्नला मोठं यश मिळवून दिलं.

प्रथम फलंदाजी करताना सॅम हार्पर ( ३३) व मॅकेंझी     हार्वी ( ५६) यांच्या दमदार खेळाच्या जोरावर मेलबर्ननं १५३ धावांपर्यंत टप्पा गाठला. जेम्स सेयमोरनं २३ धावांची खेळी केली. पण, अन्य फलंदाजांना अपयश आलं. पीटर सिडलनं सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. जॉर्ज गार्टन व डॅनिएल वोराल यांनी प्रत्येकी दोन, तर राशिद खान व मॅथ्यू शॉर्ट्स यांनी प्रत्येकी १ बळी टिपला. प्रत्युत्तरात अ‍ॅडलेडला १३ षटकांत ९६ धावांवर तीन धक्के बसले आहेत. 

झहीर खान यानं तीनही विकेट घेतल्या. जॅकनं टोलावलेला चेंडू फ्रेझरनं हवेत झेपावत इतक्या चपळाईनं टिपला की लोकांना काहीच कळले नाही. 

पाहा व्हिडीओ...

BBL मधील नवीन नियम माहित्येयत का?
Power Surge - या नियमानुसार सहा षटकांचा पहिला पॉवर प्ले हा चार षटकांचा केला गेला आहे. उर्वरित दोन षटकांचा पॉवर प्ले कधी घ्यायचा याचा निर्णय फलंदाजी करणारा संघ घेऊ शकतो. पण, त्यांना ११व्या षटकानंतरच पॉवर प्लेमधील दोन षटकांचा पॉवर प्ले घेता येणार आहे. त्यानुसार क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला फक्त दोनच खेळाडू सर्कल बाहेर ठेवता येतील.

 

X-factor Player - हा खूप मजेशीर नियम आहे. आता कर्णधारांना ११ खेळाडूंची नव्हे तर १२ किंवा १३ खेळाडूंची अंतिम यादी तयार करावी लागणार आहे. त्यानुसार सामन्याच्या १०व्या षटकानंतर १२ वा किंवा १३ वा खेळाडूपैकी कोणीही अंतिम ११मधील एका खेळाडूला रिप्लेस करू शकतो. पण, अट अशी राहिल की ज्या खेळाडूला बदली करणार आहे, त्यानं फलंदाजी केलेली नसावी किंवा एकपेक्षा अधिक षटक टाकलेलं नसावं.

 

Bash Boost - या नियमाचा दोन्ही संघांना समान फायदा असेल. डावाच्या मध्यंतराला दोन्ही संघाला बोनस गुण मिळवण्याची संधी आहे. जर एखादा संघ धावांचा पाठलाग करत असेल आणि त्यानं लक्ष्य ठेवणाऱ्या संघाच्या १०व्या षटकानंतरच्या धावांपेक्षा अधिक धावा पहिल्या १० षटकांत केल्या, तर त्यांना १ बोनस गुण मिळेल. तसंच लक्ष्याचा बचाव करणाऱ्या संघाच्या तुलनेत प्रतिस्पर्धी संघानं १० षटकांत कमी धावा केल्या, तर पहिली फलंदाजी करणाऱ्या संघाला तो बोनस गुण मिळेल. 

Web Title: What an unbelievable catch by Jake Fraser-McGurk in the Big Bash League, Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.