west indies can beat India in their home ground, Andre Russel said... | भारताला त्यांच्याच मैदानात पराभवाची धूळ चारू, वेस्ट इंडिजच्या धडाकेबाज फलंदाजाचे वादग्रस्त वक्तव्य
भारताला त्यांच्याच मैदानात पराभवाची धूळ चारू, वेस्ट इंडिजच्या धडाकेबाज फलंदाजाचे वादग्रस्त वक्तव्य

मुंबई : बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सामने रंगणार आहेत. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये तीन ट्वेन्टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका रंगणार आहे. भारताला आम्ही त्यांच्याच मैदानात पराभवाची धूळ चारू, असे वादग्रस्त वक्तव्य वेस्ट इंडिजच्या एका धडाकेबाज फलंदाजाने केला आहे.

वेस्ट इंडिजचा संघ ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये तगडा समजला जातो. सध्याच्या घडीला वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये क्रिकेट मालिका सुरु आहे. या मालिकेनंतर वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यामध्ये क्रिकेट मालिकांना सुरुवात होणार आहे.

भारताविरुद्धच्या मालिकेतबाबत वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल म्हणाला की, " भारतामध्ये खेळण्याचा आम्हाला चांगला अनुभव आहे. त्याचबरोबर आमचा संघही चांगला बांधला गेला आहे. त्यामुळे भारताला आगामी मालिकांमध्ये आम्ही धक्का देऊ शकतो. " 

बांगलादेशिरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात तर मयांकने द्विशतकासह दमदार फलंदाजीचा नमुना पेश केला होता. आता त्याला ताही दिवसांतच गूड न्यूज मिळणार असल्याचे कळत आहे. भारताने इंदूर येथे झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मोठा विजय मिळवला. भारताने बांगलादेशला तब्बल एक डाव आणि १३० धावांनी पराभूत केले. या विजयासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मयांकने फक्त द्विशतक झळकावले नाही, तर त्याची खेळी चांगलीच आक्रमकही होती. द्विशतक झळकावताना मयांकने षटकार लगावला होता. त्यावेळी काही जणांना वीरेंद्र सेहवागचीही आठवण आली. त्यामुळे आता सेहसागसारखीच भूमिका मयांकला मिळू शकते, असे म्हटले जात आहे.

बांगलादेश मालिकेनंतर वेस्ट इंडिजचा संघ भारतात तीन वन डे आणि तीन ट्वेंटी-20 मालिका खेळण्यासाठी येणार आहे. या मालिकेत रोहितला विश्रांती दिली जाऊ शकते. टीम इंडियाचा मर्यादित षटकांच्या संघाचा उप कर्णधार रोहित गेले वर्षभर सातत्यानं खेळत आहे. त्यात इंडियन प्रीमिअर लीगमधील 16 सामन्यांसह 60 हून अधिक सामन्यांचा समावेश आहे. त्यामुळे त्याच्यावरील कामाचा ताण लक्षात घेता, त्यालाही विश्रांतीची गरज आहे.  त्यामुळे रोहितला विश्रांती दिल्यावर मयांकची एकदिवसीय किंवा ट्वेन्टी-20 संघात वर्णी लागू शकते, असे म्हटले जात आहे.


विंडीज मालिकेचे वेळापत्रक

ट्वेंटी-20 मालिका
6 डिसेंबर - मुंबई
8 डिसेंबर - तिरुवनंतपुरम
11 डिसेंबर - हैदराबाद

वन डे मालिका
15 डिसेंबर- चेन्नई
18 डिसेंबर- विशाखापट्टणम
22 डिसेंबर - कट्टक

Web Title: west indies can beat India in their home ground, Andre Russel said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.