सेहवाग सर्वात आघाडीवर
कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या ५ भारतीयांमध्ये चौघांनी एकाच सामन्यात शतके झळकावल्याचा रेकॉर्ड
या मैदानात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वीरेंद्र सेहवाग सर्वात आघाडीवर आहे.
भारताचा माजी स्फोटक सलामीवीर सेहवागनं फेब्रुवारी २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कोलकाता कसोटी सामन्यात १६५ धावांची खेळी केली होती.
याच कसोटी सामन्यात व्हीव्हीएस लक्ष्मण याने देखील दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १४३ धावांची नाबाद खेळी केल्याचा रेकॉर्ड आहे.
महेंद्रसिंह धोनीनं २०१० च्या कोलकाता कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व करताना १३२ धावांची नाबाद खेळी केली होती.
२०१० मध्ये कोलताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यात सचिन तेंडुलकनं १०६ धावांची खेळी केली होती.
या चौघांच्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर ६ बाद ६४३ धावांवर डाव घोषित केला होता.
१९९६ मध्ये माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याने कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात १०९ धावांची खेळी केल्याचा रेकॉर्ड आहे.