...अन् लोकप्रियतेसह वाढली कमाई
महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत वाइल्ड कार्ड एन्ट्री मारून संघाला विश्वविजेतेपद मिळवून देणाऱ्या कामगिरीनंतर शफाली वर्माची ब्रँड वॅल्यू कमालीची वाढली आहे.
भारताची स्फोटक बॅटर शफालीची वर्ल्ड कप स्पर्धेआधीची ब्रँड वॅल्यू जवळपास ४० लाखच्या घरात होती. यात दुप्पट तिप्पट वाढ झाली आहे.
वर्ल्ड चॅम्पियनचा टॅग लागल्यावर शफालीची ब्रँड वॅल्यू एक कोटींच्याही पलीकडे पोहचल्याचा अंदाज आहे.
वर्ल्ड कप स्पर्धेनंतर शफालीला Twamev या कपड्यांच्या अलिशान ब्रँडच्या जाहिरातीचे फोटोशूटही केल्याचे पाहायला मिळाले.
Google India साठी तिने केलेली जाहिरातही चांगलीच लोकप्रिय ठरली. “Search Like Never Before” या रीलची तुलना AI मोडशी केली गेली.
मैदानातील दमदार कामगिरीनंतर शफाली आता ब्रँडसाठी बॅटिंग करण्यासाठीही तयार झाली आहे.
येत्या काळात हा आकडा आणखी वाढून तिच्या कमाईत निश्चितच मोठी भर पडेल, असे चित्र सध्याच्या घडीला निर्माण झाले आहे.