दोघांनी धरला पाकिस्तानचा रस्ता
क्रिकेट जगतातील वेगवेगळ्या टी-२० लीगमध्ये खास छाप सोडणारा ग्लेन मॅक्सवेल IPL २०२६ च्या मिनी लिलावात दिसणार नाही.
३७ वर्षीय ऑस्ट्रेलियन खेळाडूने IPL मध्ये २८०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. PBKS संघाने नारळ दिल्यावर त्याने मिनी लिलावातून हटण्याचा निर्णय घेतलाय.
मसल पॉवर आंद्रे रसेल याने KKR संघाकडून १० वर्षांच्या IPL कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे. मिनी लिलावाआधीच त्याने निवृत्ती घेतली.
१७४ च्या स्ट्राइक रेटसह २६०० पेक्षा अधिक धावा आणि १२३ विकेट्स नावे असलेला हा धाकड फलंदाज मिनी लिलावात दिसणार नाही.
दक्षिण आफ्रिकेचा ४१ वर्षीय दिग्गज क्रिकेटर फाफ ड्युप्लेसिस याने IPL सोडून PSL चा मार्ग धरला आहे. CSK सह RCB नंतर तो DC च्या ताफ्यात दिसला होता.
मोईन अली यानेही IPL सोडून PSL चा मार्ग धरला आहे. या क्रिकेटरला २०२१ आणि २०२३ मध्ये CSK कडून IPL चॅम्पियन टॅग लागला.
२०१० अन् २०११ च्या हंगामात CSK च्या ताफ्यातून IPL चॅम्पियनचा टॅग लागलेल्या अश्विननं रिटेन रिलीज खेळाच्या आधीच IPL मधून निवृत्ती घेतली.