अभिषेकनावे झाला खास रेकॉर्ड
क्रिकेटच्या मैदानात जे सिक्सर किंग युवराज सिंग आणि हिटमॅन रोहित शर्माला जमलं नाही ते अभिषेक शर्मानं करून दाखवलं आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर ईयरमध्ये १०० षटकार मारणारा तो पहिला भारतीय बॅटर ठरला आहे.
इथं एक नजर टाकुयात अभिषेक शर्मासह एका वर्षात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या आघाडीच्या ६ फलंदाजांच्या खास रेकॉर्डवर
कॅरेबियन स्फोटक बॅटर निकोलस पूरन या यादीत अव्वलस्थानी आहे. २०२४ मध्ये त्याने टी-२० क्रिकेटमध्ये १७० षटकार मारले होते.
२०१५ हे वर्ष ख्रिस गेलनं गाजवलं होते. या कॅलेंडर ईयरमध्ये त्याच्या बॅटमधून १३५ षटकार पाहायला मिळाले होते.
लिंबू टिंब ऑस्ट्रिया संघातील करनबीर सिंग याने यंदाच्या (२०२५) कॅलेंडर ईयरमध्ये १२२ षटकार मारल्याचा रेकॉर्ड आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या हेन्री क्लासेन याने २०२४ च्या कॅलेंडर ईयरमध्ये १०५ षटकार मारले होते.
अभिषेक शर्मानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेआधी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील टी-२० सामन्यात षटकारांचे शतक साजरे केले.
या वर्षात म्हणजे २०२५ मध्ये पाकिस्तानच्या साहिबजादा फरहान यानेही १०० षटकार मारले आहेत.