आयपीएल आयोजनाचा प्रस्ताव दिला नाही, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे स्पष्टीकरण

‘प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्या या फक्त शक्यता आहेत. आयपीएलच्या आयोजनासाठी आम्ही बीसीसीआयला कोणताही प्रस्ताव दिलेला नाही किंवा आम्ही अजून तसा विचारही केलेला नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 03:29 AM2020-07-10T03:29:00+5:302020-07-10T07:23:22+5:30

whatsapp join usJoin us
we not gave proposal for Organizing IPL, New Zealand Cricket Board clarifies | आयपीएल आयोजनाचा प्रस्ताव दिला नाही, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे स्पष्टीकरण

आयपीएल आयोजनाचा प्रस्ताव दिला नाही, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे स्पष्टीकरण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

वेलिंग्टन : यंदा इंडियन प्रीमियर लीगच्या आयोजनाचा प्रस्ताव आम्ही दिलेला नाही. या संदर्भात मीडियात आलेले वृत्त खोडसाळ आणि दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्टीकरण न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने गुरुवारी दिले. काही दिवसांपूर्वी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बीसीसीआय अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली होती. श्रीलंका आणि यूएईपाठोपाठ न्यूझीलंडनेही आयपीएलच्या तेराव्या पर्वाचे आयोजन करण्याची तयारी दाखवल्याची माहिती दिली होती. तथापि न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे प्रवक्ते रिचर्ड बुक यांनी हा दावा खोडून काढला असून,  न्यूझीलंड क्रिकेटने असा कोणताही प्रस्ताव दिलेला नसल्याचे स्पष्ट केले.

‘प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्या या फक्त शक्यता आहेत. आयपीएलच्या आयोजनासाठी आम्ही बीसीसीआयला कोणताही प्रस्ताव दिलेला नाही किंवा आम्ही अजून तसा विचारही केलेला नाही,’ असे बुक यांनी रेडियो न्यूझीलंडशी  बोलताना सांगितले. न्यूझीलंड क्रिकेटने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर बीसीसीआय अधिकाºयाने कोणत्या आधारावर ही माहिती दिली, असा प्रश्न आता विचारला जात आहे. कोरोनामुळे २९ मार्चपासून होणारे आयपीएलचे आयोजन अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)

एफटीपीचा सन्मान करावा लागेल
‘हे वृत्त खोडसाळ आहे. भविष्यातील दौरा कार्यक्रमास आम्ही बांधील आहोत. न्यूझीलंड बोर्डाने आयपीएल आयोजनात कधीही स्वारस्य दाखवले नाही. आम्ही आयपीएल आयोजनाच्या स्थितीत नाही. आमच्याकडे असा कुठलाही प्रस्ताव देखील आलेला नाही. आयपीएलच्या तारखा आणि एफटीपी एकाचवेळी येत असल्याने आम्ही असे करू शकणार नाही. आयसीसी वेळापत्रकाचा आम्ही सन्मान करतो.’
-रिचर्ड बुक, प्रवक्ते न्यूझीलंड क्रिकेट

Web Title: we not gave proposal for Organizing IPL, New Zealand Cricket Board clarifies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.