IPL 2020 : KXIPविरुद्धच्या थरारक सामन्यात MI चा कर्णधार रोहित शर्मानं दिली शिवी; Video Viral

Indian Premier League ( IPL 2020) मध्ये रविवारी किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) आणि मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) यांच्यातल्या सामन्यात कमालीची चुरस पाहायला मिळाली.

By स्वदेश घाणेकर | Published: October 19, 2020 04:53 PM2020-10-19T16:53:30+5:302020-10-19T16:54:10+5:30

whatsapp join usJoin us
Watch Video : Rohit Sharma Caught Saying ‘Behe***d’ During Thrilling Clash Against KXIP | IPL 2020 : KXIPविरुद्धच्या थरारक सामन्यात MI चा कर्णधार रोहित शर्मानं दिली शिवी; Video Viral

IPL 2020 : KXIPविरुद्धच्या थरारक सामन्यात MI चा कर्णधार रोहित शर्मानं दिली शिवी; Video Viral

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League ( IPL 2020) मध्ये रविवारी किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) आणि मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) यांच्यातल्या सामन्यात कमालीची चुरस पाहायला मिळाली. लोकेश राहुल पंजाबला सहज विजय मिळवून देईल असे वाटत असताना जसप्रीत बुमराहनं १८व्या षटकात त्याला बाद करून सामना फिरवला. त्यानंतरही पंजाबनं ५ बाद १७६ धावांवर समाधान मानावे लागले आणि सुपर ओव्हरमध्येही बरोबरी झाल्यानं लढत डबल सुपर ओव्हरमध्ये खेळवला गेला. त्यात पंजाबनं बाजी मारली. डबल 'सुपर ओव्हर'च्या थरारानंतर Mystery Girlनं वेधलं सर्वांचं लक्ष!

मुंबई इंडियन्सच्या ६ बाद १७६ धावांच्या प्रत्युत्तरात किंग्स इलेव्हन पंजाबलाही ५ बाद१७६ धावांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर Super Overमध्ये प्रथम फलंदाजीला आलेल्या पंजाबला जसप्रीत बुमराहनं ५ धावांवर रोखलं. पण, मोहम्मद शमीनंही टिच्चून मारा करताना मुंबई इंडियन्सला ५ धावा करू दिल्या.  दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सकडून किरॉन पोलार्ड आणि हार्दिक पांड्या मैदानावर उतरले. मुंबईला 1 बाद 11 धावांवर समाधान मानावे लागले. ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचून ख्रिस गेलनं पंजाबवरील दडपण हलकं केलं. त्यानंतर मयांक अग्रवालनं दोन चौकार खेचून पंजाबचा विजय पक्का केला.   

रोहित शर्मानं शिवी कधी दिली?
१७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या पंजाबला अखेरच्या षटकात विजयासाठी ९ धावांची गरज होती. दीपक हुडा व ख्रिस जॉर्डन खेळपट्टीवर होते. या दोघांनी पहिल्या दोन चेंडूंवर पाच धावा घेतल्या, परंतु नंतरच्या तीन चेंडूवर केवळ तीन धावाच करता आल्या. अखेरच्या षटकात दुसरी धाव घेताना जॉर्डन धावबाद झाला आणि त्याचवेळी रोहितच्या तोंडून शिवी निघाली.   

पाहा व्हिडीओ...


 

Web Title: Watch Video : Rohit Sharma Caught Saying ‘Behe***d’ During Thrilling Clash Against KXIP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.