2007च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत कर्णधारपद मिळेल अशी आशा होती, पण MS Dhoniच्या नावाची घोषणा झाली - युवराज सिंग 

2007च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागल्यानंतर भारतीय क्रिकेट संघात बदलाचे वारे जोराने वाहू लागले.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 03:23 PM2021-06-10T15:23:22+5:302021-06-10T15:25:11+5:30

whatsapp join usJoin us
Was expecting to be named India captain over MS Dhoni at 2007 World T20: Yuvraj Singh | 2007च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत कर्णधारपद मिळेल अशी आशा होती, पण MS Dhoniच्या नावाची घोषणा झाली - युवराज सिंग 

2007च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत कर्णधारपद मिळेल अशी आशा होती, पण MS Dhoniच्या नावाची घोषणा झाली - युवराज सिंग 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला वन डे वर्ल्ड कपमध्ये अपयश आलं. भारताला त्या स्पर्धेत बांगलादेश व श्रीलंका संघांकडून हार पत्करावी लागली. त्याचवर्षी  ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात झाली आणि भारताचा भविष्याच्या कर्णधाराचीही चाचपणी सुरू झाली. 2007च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवड समितीनं टीम इंडियाच्या नेतृत्वाची जबादारी यष्टिरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनी याच्याकडे सोपवली अन् युवराज सिंगला आश्चर्याचा धक्का बसला. ( Was expecting to be named India captain over MS Dhoni at 2007 World T20: Yuvraj Singh)

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर राहुल द्रविड, सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर इत्यादी सीनियर खेळाडूंनी ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे धोनीच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. 2007च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत युवराज सिंगनं महत्त्वाची भूमिका बजावली होती. अंतिम सामन्यात पाकिस्तानला नमवून भारतानं जेतेपद पटकावलं. "भारताला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत हार मानावी लागली होती, बरोबर? त्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये अनेक घडामोडी घडल्या आणि त्यानंतर दोन महिन्यांचा इंग्लंड दौरा. महिनाभराचा दक्षिण आफ्रिका व आयर्लंड दौरा आणि महिनाभर ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा होती. त्यामुळे चार महिने घरापासून लांब होतो,"असे युवी म्हणाला. पाकिस्तानी खेळाडू मैदानावरील कामगिरीपेक्षा मसाज करण्यात तरबेज, तोच खरा पुरुष; अभिनेत्री वीणा मलिकचा दावा

"संघातील सीनियर्स खेळाडूंना विश्रांतीची गरज होती आणि ती मिळायलाच हवी होती. त्यांच्यादृष्टीनं ट्वेंटी-20 वर्ल्ड कप एवढा महत्त्वाचा नव्हता. त्यांच्या अनुपस्थितीत ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व मला मिळणे अपेक्षित होतं, परंतु महेंद्रसिंग धोनीचं कर्णधार म्हणून नाव घोषित झाले," असेही युवीनं सांगितले.

कर्णधारपद न मिळाल्यानं युवी व धोनी यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला नाही. भारतीय क्रिकेटमधील ही दोघं बेस्ट बडी होते. युवी म्हणाला," राहुल असो किंवा सौरव कुणीही कर्णधार असला तरी त्यांना सहकार्य करणे हे खेळाडू म्हणून आमची जबाबदारी होती. सरतेशेवटी तुम्ही एक संघ म्हणून मैदानावर उतरता." 

Web Title: Was expecting to be named India captain over MS Dhoni at 2007 World T20: Yuvraj Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.