IPL 2021 : मोठी घोषणा; टीम इंडियाच्या फलंदाजांची भंबेरी उडवणारा गोलंदाज RCB कडून खेळणार, प्रशिक्षकही बदलले!

. पंजाब किंग्सनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणात हॅटट्रिक घेत वर्ल्ड रिकॉर्ड नोंदवलेल्या नॅथन एलिसला करारबद्ध केलं. आता विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ( RCB) संघानंही नव्या खेळाडूला करारबद्ध केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 03:24 PM2021-08-21T15:24:41+5:302021-08-21T15:25:24+5:30

whatsapp join usJoin us
Wanindu Hasaranga replaced Adam Zampa in RCB for the rescheduled IPL, Mike Hesson will be the head coach of RCB  | IPL 2021 : मोठी घोषणा; टीम इंडियाच्या फलंदाजांची भंबेरी उडवणारा गोलंदाज RCB कडून खेळणार, प्रशिक्षकही बदलले!

IPL 2021 : मोठी घोषणा; टीम इंडियाच्या फलंदाजांची भंबेरी उडवणारा गोलंदाज RCB कडून खेळणार, प्रशिक्षकही बदलले!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या पर्वासाठी सर्व संघ सज्ज होत आहेत. गतविजेता मुंबई इंडियन्स, माजी विजेता चेन्नई सुपर किंग्स हे संघ दुबईत दाखल झाले असून त्यांनी सरावालाही सुरुवात केली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ आज दुबईत दाखल होईल. पंजाब किंग्सनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणात हॅटट्रिक घेत वर्ल्ड रिकॉर्ड नोंदवलेल्या नॅथन एलिसला करारबद्ध केलं. आता विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ( RCB) संघानंही तीन खेळाडूंना करारबद्ध केले आहे. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अ‍ॅडम झम्पा हा दुसऱ्या टप्प्यात सहभागी होणार नाही. त्याच्या जागी RCBनं श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वनिंदू हसरंगा याला करारबद्ध केले आहे. ( Sri Lankan all-rounder Wanindu Hasaranga replaced Adam Zampa in RCB for the rescheduled IPL) 

संयुक्त अऱब अमिराती येथे ( UAE) 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित ३१ सामने खेळवण्यात येणार आहेत. कोरोनाच्या शिरकाव झाल्यामुळे भारतात सुरू असलेली आयपीएल 2021 स्पर्धा स्थगित करावी लागली. त्यानंतर या लीगचे उर्वरित 31 सामने दुबई, अबु धाबी आणि शाहजाह येथे खेळवण्याचा निर्णय झाला. 15 ऑक्टोबरला दुबईत अंतिम सामना होणार आहे, तर 10 ऑक्टोबरला पहिला क्वालिफायर, 11 ऑक्टोबरला एलिमिनेटर आणि 13 ऑक्टोबरला दुसरा क्वालिफायर सामना होणार आहे.  

IPL 2021 schedule : मुंबई-चेन्नई भिडणार, जाणून घ्या दुसऱ्या टप्प्याचे सामन्यांची तारीख, वेळ अन् ठिकाण!

टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्यावर वनिंदू हसरंगानं दमदार कामगिरी केली होती. त्याच्या फिरकीचा सामना करताना भारताचे फलंदाज चाचपडले होते. त्यानं तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामन्यांत एकूण १० विकेट्स घेतल्या. तिसऱ्या ट्वेंटी-२०त त्यानं ९ धावांत ४ विकेट्स घेतल्या होत्या. याचसोबत दुसऱ्या टप्प्यात सायमन कॅटिचनं वैयक्तिक कारणास्तव माघार घेतल्यामुळे माईक हेसन यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी असणार आहे. ( Mike Hesson will be the head coach of RCB in IPL 2021 as Simon Katich stepped down due to personal reasons). यासह दुष्मंथा चमिरा व टीम डेव्हिड हे केन रिचर्डसन व फिन अॅलन यांना रिप्लेस करणार आहेत.

 


गुणतालिका!
आयपीएल २०२१ मध्ये रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सनं 8 पैकी 6 सामने जिंकून 12 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. चेन्नई सुपर किंग्स 7 पैकी 5 सामने जिंकून दुसऱ्या क्रमांकावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू ( 10 गुण), मुंबई इंडियन्स ( 8), राजस्थान रॉयल्स ( 6), पंजाब किंग्स ( 6), कोलकाता नाइट रायडर्स ( 4) व सनरायझर्स हैदराबाद ( 2) हे गुणतालिकेत एकापाठोपाठ आहेत. 

Web Title: Wanindu Hasaranga replaced Adam Zampa in RCB for the rescheduled IPL, Mike Hesson will be the head coach of RCB 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.