व्हेरी व्हेरी स्पेशल कौतुक; 'सेंट जॉर्ज'मधील दिव्यांग ऑपरेटरच्या कर्तव्यनिष्ठेला लक्ष्मणचा 'हॅट्स ऑफ'

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य सेवक, डॉक्टर्स, नर्स, सफाई कर्मचारी, पोलीस आदी अनेकजण दिवसरात्र मेहनत घेत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 06:22 PM2020-07-14T18:22:45+5:302020-07-14T18:28:29+5:30

whatsapp join usJoin us
VVS Laxman Hats off to St. George's Hospital telephone operator Raju Chavan who is visually impaired  | व्हेरी व्हेरी स्पेशल कौतुक; 'सेंट जॉर्ज'मधील दिव्यांग ऑपरेटरच्या कर्तव्यनिष्ठेला लक्ष्मणचा 'हॅट्स ऑफ'

व्हेरी व्हेरी स्पेशल कौतुक; 'सेंट जॉर्ज'मधील दिव्यांग ऑपरेटरच्या कर्तव्यनिष्ठेला लक्ष्मणचा 'हॅट्स ऑफ'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही 1 कोटी 32 लाख 61,250 इतकी झाली आहे. त्यापैकी 5 लाख 76,316 रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत, तर 77 लाख 33,004 रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा 9 लाख 11,629 इतका झाला असून 5 लाख 73, 953 रुग्ण बरे झाले आहेत. 23,788 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य सेवक, डॉक्टर्स, नर्स, सफाई कर्मचारी, पोलीस आदी अनेकजण दिवसरात्र मेहनत घेत आहेत. अशा कोरोना वॉरियर्सना देशातील प्रत्येक व्यक्ती आज सॅल्यूट ठोकत आहे. भारताचा माजी कसोटीपटू व्ही व्ही एस लक्ष्मण यानं मुंबईतील एका दिव्यांग ऑपरेटरच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम केला.

क्रिकेटमध्ये नवा प्रयोग; 'सुपर ओव्हर'ऐवजी 'गोल्डन बॉल', जाणून घ्या कसा लागतो सामन्याचा निकाल!

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. सोमवारपर्यंत राज्यात 6497 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 2 लाख 60924 इतकी झाली होती. त्यापैकी 1 लाख 44, 507 रुग्ण बरे झाले असून 105637 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात सर्वाधिक रुग्ण असले तरी त्यांच्या बऱ्या होण्याचे प्रमाणही अधिक आहेत. या सर्व रुग्णांसाठी झटणाऱ्या कोरोन वॉरियर्समध्ये सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधील राजू चव्हाण यांचाही समावेश आहे. 

लक्ष्मणनं रविवारी ट्विट करून राजू चव्हाण यांना सलाम केला. लक्ष्मणनं लिहिलं की,'' मुंबईतील राजू चव्हाण हे दृष्टिहीन आहेत आणि ते येथील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम करत आहेत. दिव्यांग असूनही ते कोणतंही कारण न देता काम करत आहेत आणि या संकटात त्यांनी एकही सुट्टी घेतलेली नाही. गरजूंना ते मदत करत आहेत. त्यांच्या कामाला सलाम.'' 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

दिग्गज खेळाडूच्या मुलाचा 'हॉट' अभिनेत्रीसोबत साखरपुडा; फोटो व्हायरल 

... म्हणून शिखर धवनची पत्नी किक बॉक्सिंग शिकली; सत्य जाणून बसेल धक्का! 

महेंद्रसिंग धोनीनंतर विराट कोहलीचा लॉकडाऊन लूक व्हायरल; डोळ्यांवर बसणार नाही विश्वास!

ENG v PAK : पाकिस्तानी क्रिकेटपटूंची राहण्यासाठी सोय फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नाही तर...

भारत-पाकिस्तान मालिका विचारातच घेत नाही, कारण...; पाकिस्तान क्रिकेट मंडळाचं वादग्रस्त विधान

IPL 2020 साठी आता बीसीसीआय ऑस्ट्रेलिया दौरा पुढे ढकलणार?

Web Title: VVS Laxman Hats off to St. George's Hospital telephone operator Raju Chavan who is visually impaired 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.