Virat Kohli's romantic photo with Anushka Sharma; Fans said ... | विराट कोहलीने टाकला अनुष्काबरोबरचा रोमँटिक फोटो; चाहते म्हणाले...
विराट कोहलीने टाकला अनुष्काबरोबरचा रोमँटिक फोटो; चाहते म्हणाले...

मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली हा सध्या दिवाळीच्या सुट्टीवर आहे. पत्नी अनुष्का शर्माबरोबर विराट सध्या दिवाळीच्या सणाचा आनंद लुटत आहे. यावेळी विराटने अनुष्काबरोबरचा एक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा फोटो आता चांगलाच वायरल झालेला पाहायला मिळतो आहे.

विराटच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन्ही मालिका जिंकल्या आहेत. पण आगामी बांगलादेशविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेतून विराटने माघार घेतली आहे. त्यामुळे या मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात आले आहे.

अनुष्काबरोबरच्या फोटोमध्ये कोहली हा सफेद रंगाच्या टी-शर्टमध्ये आहे. यारंगाला साजेशी पँटही त्याने घातली असून एक ओव्हरकोट घातला आहे. अनुष्काने यावेळी पारंपारिक कपडे परीधान केले आहेत. या फोटोवर चाहत्यांनी भरपूर प्रतिक्रीया दिल्या आहेत.

Web Title: Virat Kohli's romantic photo with Anushka Sharma; Fans said ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.