विराट कोहलीचा इन्स्टाग्रामवर नवा विक्रम, जो कोणत्याही भारतीयाला जमला नव्हता

इन्स्टाग्रामचेच स्वत:चे 33 कोटी फॉलोअर्स आहेत. यामुळे इन्स्टाग्रामच जगात सर्वात पुढे आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 12:23 PM2020-02-18T12:23:19+5:302020-02-18T12:28:06+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli's new record on Instagram, Priyanka Chopra on second number | विराट कोहलीचा इन्स्टाग्रामवर नवा विक्रम, जो कोणत्याही भारतीयाला जमला नव्हता

विराट कोहलीचा इन्स्टाग्रामवर नवा विक्रम, जो कोणत्याही भारतीयाला जमला नव्हता

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देब्राझिलचा प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियाने रोनाल्डोचा पहिला नंबर लागतो. तिसऱ्या क्रमांकावर अमेरिकेची गायिका एरियाना ग्रांडे असून तिचे 17.5 कोटी पाठीराखे आहेत. 

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे इन्साग्रामवर तब्बल 5 कोटी फॉलोअर्स झाले आहेत. हा विक्रम करणारा कोहली हा पहिला भारतीय आहे. यानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्रा दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रियांकाचे 4.99 कोटी फॉलोअर्स आहेत. पण जगभरात कोणालाही अद्याप फुटबॉलपटू ख्रिस्तियाने रोनाल्डोचा विक्रम मोडता आलेला नाही. 


इन्स्टाग्रामचेच स्वत:चे 33 कोटी फॉलोअर्स आहेत. यामुळे इन्स्टाग्रामच जगात सर्वात पुढे आहे. यानंतर ब्राझिलचा प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियाने रोनाल्डोचा नंबर लागतो. त्याचे 20.3 कोटी फॉलोअर्स असून तो जगातील सर्वाधिक पाठीराखे असणारा व्यक्ती आहे. तिसऱ्या क्रमांकावर अमेरिकेची गायिका एरियाना ग्रांडे असून तिचे 17.5 कोटी पाठीराखे आहेत. 

रोनाल्डोने 2019 मध्ये पेड इन्स्टाग्राम पोस्टद्वारे जवळपास 340 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर ज्युवेंट्स क्लबमध्ये त्याचे वार्षिक पॅकेज 242 कोटी रुपये आहे. रोनाल्डोला एका इन्स्टा पोस्टसाठी 6.9 कोटी रुपये दिले जातात. सोशल मिडीयावरील कमाईमध्ये बार्सिलोनाचा खेळाडू मेस्सी दुसऱ्या क्रमांकावर आहे. 36 पोस्ट द्वारे 165 कोटी रुपये कमावतो. तर कोहली एका वर्षात 8.3 कोटी रुपये मिळवत 11 व्य़ा क्रमांकावर आहे. 


कोहलीची एकूण 70 शतके
भारतीय संघ सध्या न्युझीलंड दौऱ्यावर आहे. येथे दोन कसोटी खेळली जाणार आहेत. पहिल्या मॅचमध्ये वेलिंग्टनमध्ये 21 फेब्रुवारीपासून खेळला जाणार आहे. कोहलीने 84 टेस्ट, 248 वनडे आणि 81 टी 20 खेळल्या आहेत. त्यांनी टेस्टमध्ये 54.98 च्या सरासरीनुसार 7202, वनडेमध्ये 59.34 च्या सरासरीनुसार 11867 आणि 20-20 मध्ये 50.8 च्या सरासरीनुसार 2794 रन्स बनविले आहेत. त्याने एकूण 70 शतके झळकावली आहेत.

Read in English

Web Title: Virat Kohli's new record on Instagram, Priyanka Chopra on second number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.