ICCAwards : विराट कोहली ठरला दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, महेंद्रसिंग धोनीनंही पटकावला मोठा पुरस्कार

कोहली दशकातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू, तसेच सर्वोत्तम कसोटी, वन डे व ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठीच्या पुरस्काराच्या शर्यतीत होता.

By स्वदेश घाणेकर | Published: December 28, 2020 02:25 PM2020-12-28T14:25:50+5:302020-12-28T14:34:16+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli wins the Sir Garfield Sobers Award for ICC Male Cricketer of the Decade, MS Dhoni wins the Spirit of Cricket Award  | ICCAwards : विराट कोहली ठरला दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, महेंद्रसिंग धोनीनंही पटकावला मोठा पुरस्कार

ICCAwards : विराट कोहली ठरला दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, महेंद्रसिंग धोनीनंही पटकावला मोठा पुरस्कार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दशकातील सर्वोत्तम वन डे क्रिकेटपटूनंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) दशकातील सर्वोत्तम  पुरुष क्रिकेटपटूला दिला जाणारा सर गार्फिल्ड सोबर्स पुरस्कार  ( Sir Garfield Sobers Award ) जिंकला. मागील दहा वर्षांत त्यानं वन डे क्रिकेटमध्ये १० हजाराहून अधिक धावा, ३९ शतकं व ४८ अर्धशतक झळकावली. शिवाय ११२  झेल टिपले. ''संघाच्या विजयात हातभार लावणे, हेच माझे ध्येय आहे. प्रत्येक सामन्यात ते गाठण्याचा मी प्रयत्न करतो,'' अशी प्रतिक्रिया विराटनं दिली. 

कोहली दशकातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू, तसेच सर्वोत्तम कसोटी, वन डे व ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठीच्या पुरस्काराच्या शर्यतीत होता. पण, कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथनं, तर ट्वेंटी-20त अफगाणिस्तानच्या राशिद खाननं बाजी मारली. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथनं दशकातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटूचा मान पटकावला. त्यानं या दहा वर्षांत ६५.७९च्या सरासरीनं ७०४० धावा केल्या आणि त्यात २६ शतकं व २८ अर्धशतकांचा समावेश होता.  




भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) यानं  ICC Spirit of Cricket Award of the Decade जिंकला. २०११च्या नॉटिंघम कसोटीत जो रूटला रन आऊट असतानाही धोनीनं खिलाडूवृत्ती दाखवून पुन्हा फलंदाजीला बोलावले होते. त्यासाठी धोनीला हा पुरस्कार मिळाला.

Web Title: Virat Kohli wins the Sir Garfield Sobers Award for ICC Male Cricketer of the Decade, MS Dhoni wins the Spirit of Cricket Award 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.