विराट कोहलीने 'या' हॉट अभिनेत्रीबरोबर काल रात्री पाहिला रोमँटिक सिनेमा आणि घडले असे काही...

ही हॉट अभिनेत्री आहे तरी कोण, हा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 11:44 AM2019-11-28T11:44:24+5:302019-11-28T11:48:19+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli watches a movie with 'Hot' actress last night; Photo went viral ... | विराट कोहलीने 'या' हॉट अभिनेत्रीबरोबर काल रात्री पाहिला रोमँटिक सिनेमा आणि घडले असे काही...

विराट कोहलीने 'या' हॉट अभिनेत्रीबरोबर काल रात्री पाहिला रोमँटिक सिनेमा आणि घडले असे काही...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या सुट्टीचा आनंद लुटतोय. काल रात्री तर एका हॉट अभिनेत्रीबरोबर त्याने सिनेमा पाहिला, अशी चर्चा सुरु आहे. ही हॉट अभिनेत्री आहे तरी कोण, हा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल...

Image result for kohli watching movie with girl

विराट कोहली हा सेलिब्रेटी आहे. जर कोहली दिवसा चित्रपटगृहामध्ये सिनेमा पाहायला गेला असता तर चाहत्यांची त्याला पाहण्यासाठी रीघ लागली असती. चाहत्यांनी सेल्फी आणि ऑटोग्राफ घेण्यासाठी विराटजवळ गर्दी केली असती. त्यासाठी कोहलीने आपल्यासाठी चित्रपटगृहात एका खास प्रयोगाचे आयोजन केले होते. या प्रयोगाला विराट आणि त्याच्याबरोबर ही हॉट अभिनेत्री होती.

Image result for kohli watching movie with girl

विराट आणि या हॉट अभिनेत्रीने रोमँटीक सिनेमा पाहायला असावा, असे त्यांच्या फोटोवरून वाटत आहे. विराटने आपल्या ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये विराटसह पत्नी आणि बॉलीवूडची हॉट अभिनेत्री अनुष्का शर्मा आहे. विराटने या ट्विटमध्ये लिहिले आहे की, " एका हॉट व्यक्तीबरोबर रात्री सिनेमाचा आनंद लुटला." 

बांगलादेशविरुद्धच्या ऐतिहासिक सामन्यातील विजयानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली हा पत्नी अनुष्का शर्माबरोबर सुट्टीवर गेला आहे. याबाबतची माहिती दस्तुरखुद्द कोहलीने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करून दिली आहे. कोहली आणि अनुष्का यांचा हा फोटो चांगलाच वायरल होताना दिसत आहे.

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेनंतर विराट हा पत्नी अनुष्काबरोबर फिरायला गेला आहे. या सुट्टीवर असताना विराटने आपल्या ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे आणि त्यावर एक रोमँटिक कमेंटही लिहिली आहे. या फोटोवर कोहलीने, ' आयुष्यातील सर्वात प्रिय व्यक्तीबरोबर कायम चालत राहण्याचा आनंद काही औरच असतो.' 

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने ऐतिहासिक कसोटी सामन्यात विजय मिळवला. या विजयासह कोहलीने देशवासियांना छान भेट दिली. पण कोहलीला यावेळी खास सरप्राइज दिलं ते त्याची पत्नी अनुष्का शर्माने. 

विराट सामना संपल्यावर कोलकाता येथून घरी यायला निघाला. मुंबईच्या एअरपोर्टवर तो दाखल झाला आणि तिथे भेटून अनुष्काने कोहलीला सरप्राइज दिले.

कोहली जेव्हा एअरपोर्टवर दाखल झाला तेव्हा अनुष्का आपल्या गाडीतून बाहेर पडली. आपल्याला पिक अप करायला अनुष्का येईल, असे कोहलीला वाटले नव्हते. त्यामुळे त्याने जेव्हा अनुष्काला पाहिले तेव्हा तोदेखील चकित झाला. अनुष्का कोहलीजवळ गेली आणि त्याला मिठी मारली.

Web Title: Virat Kohli watches a movie with 'Hot' actress last night; Photo went viral ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.